नागपूर: एटीएम कार्ड एकाचे, पैसे काढले दुस-यानेच; खातेधारकाला भुर्दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2017 07:10 PM2017-12-12T19:10:47+5:302017-12-12T19:12:19+5:30

जरीपटक्यातील कृषिनगर बौद्धविहाराजवळ राहणारे विजय परसरामजी खडसे यांच्या एटीएम कार्डचा गैरवापर करीत दुस-याच कुणीतरी २० हजार रुपये काढून घेतले.

Nagpur: ATM Card One, money withdrawn; Error of ATM machine: Account holder backing | नागपूर: एटीएम कार्ड एकाचे, पैसे काढले दुस-यानेच; खातेधारकाला भुर्दंड

नागपूर: एटीएम कार्ड एकाचे, पैसे काढले दुस-यानेच; खातेधारकाला भुर्दंड

googlenewsNext

नागपूर : जरीपटक्यातील कृषिनगर बौद्धविहाराजवळ राहणारे विजय परसरामजी खडसे यांच्या एटीएम कार्डचा गैरवापर करीत दुस-याच कुणीतरी २० हजार रुपये काढून घेतले. खडसे २७ नोव्हेंबरला पहाटे ५ च्या सुमारास सुगतनगरातील एसबीआयच्या एटीएममध्ये रक्कम काढण्यासाठी गेले. मात्र दोनवेळा प्रयत्न करूनही मशीनमधून पैसे बाहेर आले नाही. त्यामुळे ते घरी परत गेले. काही वेळेनंतर त्यांच्या पत्नीच्या मोबाईलवर एक मेसेज आला. मशीनमध्ये बिघाड असून, २४ तास वाट बघा, असे त्या मेसेजमध्ये नमूद होते. दरम्यान, त्यांनी आपल्या बँक खात्यात रक्कम तपासली असता २७ नोव्हेंबरला त्यांच्या खात्यातून २० हजार रुपयांचा विड्रॉल झाल्याचे त्यांना कळले. त्यामुळे खडसेंनी बँक व्यवस्थापकांकडे धाव घेतली. त्यांना सर्व प्रकार सांगितला. व्यवस्थापकाने त्यांना सात दिवस वाट बघण्याचा सल्ला दिला. सात दिवस होऊनही त्यांची कमी झालेली २० हजारांची रक्कम खात्यात जमा झाली नाही. त्यामुळे खडसेंनी जरीपटका ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. चोरट्याचा शोध घेतला जात आहे.

Web Title: Nagpur: ATM Card One, money withdrawn; Error of ATM machine: Account holder backing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.