Nagpur: ऑटोचालकास मारहाण, पैसे अन् ऑटो घेऊन चार लुटारू फरार

By दयानंद पाईकराव | Published: December 27, 2023 03:42 PM2023-12-27T15:42:37+5:302023-12-27T15:42:53+5:30

Nagpur Crime News: ऑटोचालकाला मारहाण करून त्याच्या जवळील पैसे हिसकावल्यानंतर चार आरोपी ऑटो घेऊन फरार झाले. ही घटना बजाजनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत रविवारी सायंकाळी सातच्या समारास घडली.

Nagpur: Auto driver beaten, four robbers absconding with money and auto | Nagpur: ऑटोचालकास मारहाण, पैसे अन् ऑटो घेऊन चार लुटारू फरार

Nagpur: ऑटोचालकास मारहाण, पैसे अन् ऑटो घेऊन चार लुटारू फरार

- दयानंद पाईकराव 
नागपूर : ऑटोचालकाला मारहाण करून त्याच्या जवळील पैसे हिसकावल्यानंतर चार आरोपी ऑटो घेऊन फरार झाले. ही घटना बजाजनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत रविवारी सायंकाळी सातच्या समारास घडली.

भीमराव काशीनाथ वाढवे (वय ५५, रा. पन्नासे ले आऊट स्वावलंबीनगर) असे ऑटोचालकाचे नाव आहे. रविवारी २४ डिसेंबरला सायंकाळी सात वाजता भीमराव त्यांचा एम. एच. ३१, एफ. बी-१६४८ क्रमांकाचा ऑटो घेऊन जात होते. विद्यापीठ लायब्ररी चौकात चार जणांनी त्यांना थांबविले. अंबाझरी मेट्रो स्टेशनला जायचे असल्याचे सांगून चौघेही ऑटोत बसले. त्यानंतर त्यातील एकाने ऑटो बजाजनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घाटे हॉटेलच्या मागे असलेल्या कॅब कॅफेसमोर थांबविण्यास सांगितले. त्यातील दोघे खाली उतरले. त्यांनी भीमराव यांना बाहेर ओढले. त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील रोख रक्कम हिसकावून घेतली. त्यानंतर चारही आरोपी ऑटो घेऊन फरार झाले. भीमराव यांनी दिलेल्या तक्रारीवरून बजाजनगर पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरु केला आहे.

Web Title: Nagpur: Auto driver beaten, four robbers absconding with money and auto

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.