नागपुरातील अपार्टमेंट व हॉटेल्सना कचरा प्रक्रियेची सक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 11:07 AM2018-12-13T11:07:03+5:302018-12-13T11:10:13+5:30

अपार्टमेंट व मोठ्या हॉटेल्सना ओल्या कचऱ्याची स्वत: विल्हेवाट लावावयाची आहे. शहरात ९७७ मोठे अपार्टमेंट तर ४५ मोठे हॉटेल्स आहेत. या सर्वांना कचऱ्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा उभारावयाची आहे.

Nagpur-based apartments and hotels have to comply with the garbage process | नागपुरातील अपार्टमेंट व हॉटेल्सना कचरा प्रक्रियेची सक्ती

नागपुरातील अपार्टमेंट व हॉटेल्सना कचरा प्रक्रियेची सक्ती

Next
ठळक मुद्देमहापालिका ओला कचरा उचलणार नाही अपार्टमेंटने शोधावी जागा१७ डिसेंबरपासून अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अपार्टमेंट व मोठ्या हॉटेल्सना ओल्या कचऱ्याची स्वत: विल्हेवाट लावावयाची आहे. शहरात ९७७ मोठे अपार्टमेंट तर ४५ मोठे हॉटेल्स आहेत. या सर्वांना कचऱ्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा उभारावयाची आहे. यासाठी सक्ती करण्यात आली आहे. महापालिके च्या आरोग्य विभागाचे कर्मचारी हा कचरा उचलणार नाही. फक्त सुका कचरा उचलतील. १७ डिसेंबरपासून या निर्णयांची सक्तीने अंमलबजावणी केली जाणार आहे.
शहरात कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी महापालिकेने हा पर्याय स्वीकारला आहे. नागपूर शहरात दररोज १२०० ते १३०० मेट्रिक टन कचरा गोळा केला जातो. शहरातील संपूर्ण कचरा भांडेवाडी डम्पिंगयार्ड येथे साठविला जातो. परंतु कचऱ्यावर प्रक्रिया होत नसल्याने तो साठवायचा कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे हॉटेल्स, डम्पिंगयार्ड यांना कचऱ्यावर प्रक्रिया करावयाची आहे. त्यानुसार यापुढे महापालिकेचे कर्मचारी तेथील ओला कचरा उचलणार नाही किंवा त्या परिसरात कचरा संकलित करणाऱ्या गाड्या जाणार नाहीत. शहरातील काही अपार्टमेंटने कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था केली आहे. शहरातून जमा होणारा १२०० ते १३०० मेट्रिक टन कचरा भांडेवाडीतील डम्पिंग यार्डमध्ये साठवला जातो. परंतु यातील जेमतेम १०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते.

१०० किलोहून अधिक कचरा निघणाऱ्यांना बंधन
शहरात अपार्टमेंटची संख्या मोठी असली तरी दररोज १०० किलोहून अधिक कचरा निघणारे अपार्टमेंट, मोठे हॉटेल्स यांनाच ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे बंधनकारक आहे. यासाठी अपार्टमेंटमधील फ्लॅट धारकांनी कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून कंपोस्ट खत तयार करणे अपेक्षित आहे. अशा अपार्टमेंटमधील फक्त सुका कचरा महापालिकेची कर्मचारी उचलतील.

व्यवस्था करण्याची जबाबदारी अपार्टमेंटची
बहुसंख्य अपार्टमेंटमध्ये सुका कचरा संकलित करून त्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जात नाही. जागा नसल्याचे कारण पुढे केले जात आहे. परंतु जागा अपार्टमेंटनीच शोधायची आहे. ही त्यांची जबाबदारी आहे. ही बाब अशक्य नाही, अशी भूमिका महापालिका प्रशासनाने घेतली आहे.

जागाच नसेल तर सक्ती नाही
शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित करावा, ज्या अपार्टमेंट, सोसायट्या वा हॉटेल्स मधून दररोज १०० किलो कचरा निघतो. त्यांनी ओला कचऱ्यावर प्रक्रिया करावयाची आहे. यासाठी त्यांनी जागा उपलब्ध करावी. मात्र एखाद्या अपार्टमेंटमध्ये जागाच नसेल तर तपासणी करून सक्ती केली जाणार नाही.
- डॉ. सुनील कांबळे,
आरोग्य अधिकारी, महापालिका

Web Title: Nagpur-based apartments and hotels have to comply with the garbage process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.