नागपुरात बनावट कागदपत्रांच्या आधारे एक कोटींचे कर्ज लाटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 12:49 AM2018-12-16T00:49:09+5:302018-12-16T00:50:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : बनावट कागदपत्राच्या आधारे बँकेतून एका व्यापाऱ्याने एक कोटी रुपयाचे कर्ज उचलले. विशेष म्हणजे, त्याने ...

In Nagpur, on the basis of fake documents, a one crore rupee loan was grabbed | नागपुरात बनावट कागदपत्रांच्या आधारे एक कोटींचे कर्ज लाटले

नागपुरात बनावट कागदपत्रांच्या आधारे एक कोटींचे कर्ज लाटले

Next
ठळक मुद्देबँकेला ७२ लाखांचा गंडा : पाच वर्षांनंतर प्रकरण उजेडात : कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बनावट कागदपत्राच्या आधारे बँकेतून एका व्यापाऱ्याने एक कोटी रुपयाचे कर्ज उचलले. विशेष म्हणजे, त्याने तब्बल चार वर्षे बँकेच्या कर्जाचे हप्ते भरले. वर्षभरापूर्वीपासून त्याने कर्जाची रक्कम भरणे बंद केल्याने हे फसवणुकीचे प्रकरण उघडकीस आले. विजयकुमार जमुनादास धुंदानी (वय ५६) असे आरोपीचे नाव असून, बँक अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी शुक्रवारी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
धुंदानी हा व्हीएमव्ही कॉलेजसमोर राहतो. त्याने २०१३ मध्ये कोतवालीतील स्टेट बँक शाखेत कर्ज प्रकरण सादर केले. बनावट कागदपत्रे जोडून आणि बँक अधिकाऱ्यांसोबत असलेल्या मैत्रीचा गैरफायदा घेऊन त्याने १६ आॅक्टोबर २०१३ रोजी बँकेतून १ कोटी रुपयांचे कर्ज मिळवले. त्यानंतर बँकेने पाडून दिलेल्या कर्जाचे हप्तेही त्याने व्यवस्थित भरले. २९ सप्टेंबर २०१७ पासून मात्र त्याने कर्जाची थकीत रक्कम भरणे बंद केले. त्यामुळे बँक अधिकाऱ्यांनी त्याच्याशी संपर्क केला. त्याच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याच्या कागदपत्रांची तपासणी केली असता त्याने सादर केलेली कागदपत्रे बनावट असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे बँकेच्यावतीने शेरिल सिसेल अ‍ॅन्थोनी (वय ३२) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी प्रदीर्घ चौकशी केल्यानंतर या प्रकरणी विजयकुमार धुंदानी विरुद्ध शुक्रवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

Web Title: In Nagpur, on the basis of fake documents, a one crore rupee loan was grabbed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.