नागपूर -भिवापूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रकची ट्रॅव्हल्सला धडक, १५ गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 02:13 AM2019-05-14T02:13:56+5:302019-05-14T02:14:11+5:30
लग्नाची वरात घेऊन परत येत असलेल्या ट्रॅव्हल्सला विरूद्ध दिशेने येणा-या भरधाव ट्रकने जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात १५ जण गंभीर जखमी झाले.
नागपूर (भिवापूर): लग्नाची वरात घेऊन परत येत असलेल्या ट्रॅव्हल्सला विरूद्ध दिशेने येणा-या भरधाव ट्रकने जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात १५ जण गंभीर जखमी झाले. सदर अपघात सोमवारी मध्यरात्री राष्ट्रीय मार्गावरील मरूपार फाट्यावर झाला.
प्रमोद सिताराम तारणकर (४२) रा. सोनी ता. लाखांदूर, नानेश्वर हरी ठाकरे (३५), राम हरी ठेंगडी (१९), निलकंठ बालाजी राऊत (५४), अक्षय सारंगधर ठाकरे (३७), जयश्वर नथ्थु देशमुख (३२), देवदास झिंगर राऊत (६०), राजेश्वर रामचंद्र मांडवकर (३७), विलास मनोहर दिघोरे (२५) सर्व रा.सोनी. ता. लाखांदूर जि. भंडारा अस्मिता प्रभू बुराडे (२२), युग प्रभू बुराडे (२), प्रभू शामराव बुराडे (२७), रा. सिर्सी ता. वडसा जि. गडचिरोली प्रशांत आनंदराव दरोडे (२९) रा. सोनी ता. लाखांदूर आदी जखमींची नावे आहे.
प्राप्त माहितीनुसार, सोनी ता. लाखांदूर येथील एका कुटूंबाचे नागपूर येथे सोमवारी (दि.१३) लग्न होते. त्यासाठी नातेवाईक वरातीच्या ट्रॅव्हल्स क्रमांक एम.एच. ४० बी.जी. ०५०० या ट्रॅव्हल्सने नागपूरला गेले होते. रात्रीला परत येत असतांना नागपूर -भिवापूर राष्ट्रीयमार्गावरील मरूपार फाटा परिसरात विरूध्द दिशेने येणा-या भरधाव वेगातील ट्रक क्र. सी.जी. ०८ वाय. २९९१ या ट्रकने जबर धडक दिली. अपघात इतका भयावह होता की, ट्रॅव्हल्सचा अर्धाभाग अक्षरश: कापल्यागत झाला. जखमींना प्राथमिक उपचारानंतर नागपूरला हलविण्यात आले.