अंगावर याल तर शिंगावर घेईल; नागपुरात नाना पटोले यांचा भाजपाला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 01:26 PM2017-11-09T13:26:04+5:302017-11-09T13:26:32+5:30

माझ्या वाट्याला जावू नका. अंगावर याल तर शिंगावर घेईल, असा इशारा भाजपाचे नाराज खासदार नाना पटोले यांनी भाजपाला दिला.

Nagpur BJP leader Nana Patole warned own party | अंगावर याल तर शिंगावर घेईल; नागपुरात नाना पटोले यांचा भाजपाला इशारा

अंगावर याल तर शिंगावर घेईल; नागपुरात नाना पटोले यांचा भाजपाला इशारा

Next
ठळक मुद्देफेब्रुवारीनंतर राजकीय दिशा ठरविणार

आॅनलाईन लोकमत
नागपूर : आपण पक्षाच्या व्यासपीठावर तसेच पक्ष नेत्यांकडे शेतकऱ्यांचे प्रश्न वेळोवेळी मांडले. त्यामुळे पक्षविरोधी भूमिका घेत असल्याचा आरोप करणे चुकीचे आहे. जनतेसाठी भांडणे ही माझी आदत आहे. ती मला मान्य आहे. माझ्या वैयक्तिक भानगडित पडू नका. माझ्या वाट्याला जावू नका. अंगावर याल तर शिंगावर घेईल, असा इशारा भाजपाचे नाराज खासदार नाना पटोले यांनी भाजपाला दिला.
पटोले हे सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीवर टीका करीत असून शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सरकारला लक्ष करीत आहेत. आता भाजपनेही त्यांना उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी नागपुरात पत्रकार परिषदेत घेत पटोले हे ‘आदत से मजबूर’ असल्याची टीका करीत त्यांनी पक्षाच्या व्यासपीठावर म्हणणे मांडावे, असा सल्ला दिला होता. त्यावर पटोले यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत उत्तर दिले. पटोले म्हणाले, पक्षाच्या पुणे येथील कार्यकारिणीच्या बैठकीत मी शेतकºयांचे प्रश्न उघडपणे मांडले होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या खासदारांच्या बैठकीतही तेच मांडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वळोवेळी भेट घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. त्यामुळे भंडारी यांनी मला नाहक सल्ले देऊ नयेत. भंडारी यांची स्वत:ची अवस्था बिकट आहे. विधान परिषदेत संधी न मिळाल्याने मधल्या काळात ते गायब होते, असा चिमटा त्यांनी काढला. माझे घर काचेचे नाही. पण कुणाची घरे काचेची आहेत हे मला माहीत आहे. तुम्ही प्रामाणिकपणा पाळा. शेतकºयांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र देऊन नंतर परत घेतले. हे तुमच्या अप्रामाणिकपणाचे प्रमाणपत्रच असल्याची टीका त्यांनी भाजपावर केली.
भंडाऱ्याच भाजपचा पत्ता साफ होता, त्या काळात आपण पक्ष उभा केला. मला जनतेने निवडून दिले आहे. मी पक्षाच्या किंवा नेत्यांच्या भरवशावर नाही. फेब्रुवारीनंतर राजकीय दिशा स्पष्ट करीत, असे त्यांनी एकाप्रश्नाच्या उत्तरात सांगितले. नोटाबंदीनंतर किती काळे धन परत आले, किती नकली नोटा जमा झाल्या ते आधी जाहीर करा. लाखो लोकांना त्रास झाला. तीनशे नागरिकांचा बँकेच्या रांगेत मृत्य झाला. आपण कशाचा जल्लोष साजरा करीत आहोत, असा सवाल त्यांनी केला. या वेळी जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार उपस्थित होते.

राहुल गांधींना भेटणार
- शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्याकडून पक्ष प्रवेशाच्या आॅफर आहेत. पण भाजपाला माझे महत्व समजत नाही. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील आपल्याला चर्चेसाठी फोन केला होता. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आपण दिल्ली येथे राहुल गांधी यांची भेट घेणार आहोत. शेतकऱ्यांसाठी राबवायच्या धोरणांबाबत त्यांची चर्चा करणार असल्याचे पटोले यांनी सांगितले.

यशवंत व शत्रुघ्न सिन्हांसोबत अकोल्यात एका मंचावर
- १ डिसेंबर रोजी अकोला येथे सोयाबीन, कापूस व धान परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत आपण उपस्थित राहणार असल्याचे पटोले यांनी सांगितले. यापूर्वी पटोले यांनी यशवंत सिन्हा यांची नागपूर विमानतळावर भेट घेतली होती.

Web Title: Nagpur BJP leader Nana Patole warned own party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.