नागपुरात १.६१ लाखाच्या ई-तिकिटांचा काळाबाजार पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 09:52 PM2018-11-13T21:52:48+5:302018-11-13T21:53:51+5:30

रेल्वे सुरक्षा दलाने मंगळवारी ई-तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालास अटक करून त्याच्याकडून ४२ हजार १८९ रुपये किमतीच्या १० लाईव्ह तिकिटा आणि यापूर्वी काढलेल्या १ लाख १८ हजार ७७ रुपये किमतीच्या ३९ ई तिकिटा असा एकूण १ लाख ६१ हजार रुपये किमतीच्या ई तिकिटांचा काळाबाजार उघडकीस आणला.

In Nagpur, the black market of 1.61 lakh e-ticket was seized | नागपुरात १.६१ लाखाच्या ई-तिकिटांचा काळाबाजार पकडला

नागपुरात १.६१ लाखाच्या ई-तिकिटांचा काळाबाजार पकडला

Next
ठळक मुद्देआरोपीस अटक : रेल्वे सुरक्षा दलाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाने मंगळवारी ई-तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालास अटक करून त्याच्याकडून ४२ हजार १८९ रुपये किमतीच्या १० लाईव्ह तिकिटा आणि यापूर्वी काढलेल्या १ लाख १८ हजार ७७ रुपये किमतीच्या ३९ ई तिकिटा असा एकूण १ लाख ६१ हजार रुपये किमतीच्या ई तिकिटांचा काळाबाजार उघडकीस आणला.
रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांनी ई तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी गठीत केलेल्या चमूतील उपनिरीक्षक शिवराम सिंह, विजय पाटील, दीपक वानखेडे, नीळकंठ गोरे, किशोर चौधरी यांना ई-तिकिटांचा काळाबाजार होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी लोकमत चौकातील गुप्ताजी ट्रॅव्हल्स अँड टुर्स या दुकानावर धाड टाकली. दुकानाच्या मालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव पंकज विनोद गुप्ता (४२) रा. स्वर्ण आशिष कॉलनी, सोनेगाव सांगितले. तपासात २१ बनावट खात्याद्वारे १० लाईव्ह ई-तिकीट काढल्याचे उघड झाले. या तिकिटांची किंमत ४२ हजार १८९ आहे. आयआरसीटीसीच्या लायसन्सच्या आड हा दलाल गरजू प्रवाशांकडून २०० ते ३०० रुपये अधिक घेऊन त्यांना ई-तिकीट काढून देत होता. आरपीएफने यापूर्वी काढलेल्या ३९ ई-तिकिट किंमत १ लाख १८ हजार ७७७, संगणक, प्रिंटर किंमत २४ हजार, मोबाईल किंमत १० हजार असा एकूण १ लाख ९५ हजार ७६ रुपयांचा जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध रेल्वे अ‍ॅक्ट १४३ नुसार गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली.

Web Title: In Nagpur, the black market of 1.61 lakh e-ticket was seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.