JEE Main Exam Result 2022 : ‘जेईई मेन’मध्ये नागपूरचा अद्वय क्रिष्णा महाराष्ट्रातून पहिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2022 05:10 PM2022-07-11T17:10:36+5:302022-07-11T17:24:32+5:30

JEE Main Result 2022 : आज सकाळी घोषित करण्यात आलेल्या राज्यनिहाय निकालामध्ये अद्वयने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

Nagpur boy Adwai Krishna came first from Maharashtra in the 'JEE' main examination | JEE Main Exam Result 2022 : ‘जेईई मेन’मध्ये नागपूरचा अद्वय क्रिष्णा महाराष्ट्रातून पहिला

JEE Main Exam Result 2022 : ‘जेईई मेन’मध्ये नागपूरचा अद्वय क्रिष्णा महाराष्ट्रातून पहिला

Next

नागपूर : ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ने (एनटीए) सोमवारी ‘जेईई’ मुख्य परीक्षा - २०२२ च्या सत्र एकचा निकाल जाहीर केला. या परीक्षेत अद्वय क्रिष्णा या विद्यार्थ्याने ९९.९९८४४९ पर्सेन्टाईलसह राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. 

आज सकाळी घोषित करण्यात आलेल्या राज्यनिहाय निकालामध्ये अद्वयने महाराष्ट्रातून बाजी मारली. तो जैन इंटरनॅशनल शाळेचा विद्यार्थी असून त्याने सीबीएसई बारावीची परीक्षा दिली आहे. अद्वयला दहावी परीक्षेत ९६.८ टक्के गुण मिळाले होते. मूळचा उत्तर प्रदेश येथील असलेल्या अद्वयचे वडील वेकोलोमध्ये नोकरीला आहेत. अद्वयने दहावीमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेतही यश मिळवले होते.

या परीक्षेत पात्र ठरण्यासाठी खुल्या गटातील विद्यार्थ्यांसाठी ७५ टक्के तर एससी, एसटीसाठी ६५ टक्के गुण आवश्यक आहेत. या परीक्षेची अंतिम उत्तराची यादी ६ जुलैला प्रसिद्ध झाली होती. या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांनी अपेक्षित टक्के मिळवले आहेत ते पुढील सत्रात म्हणजे दुसऱ्या दोनसाठी पात्र ठरले आहेत. सत्र दोनची परीक्षा झाल्यानंतर ‘एनटीए जेईई ॲडव्हान्स’ परीक्षेसाठीची अंतिम कट ऑफ जाहीर करेल.

-निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळ

nta.ac.in दरम्यान, ‘एनटीए जेईई’ मुख्य परीक्षा सत्र २ ही परीक्षा २१ ते ३० जुलै या कालावधीत होईल. सत्र २ ची परीक्षा पास झाल्यानंतर ‘कौन्सिलिंग’साठी ‘ऑल इंडिया रँक’ आणि ‘कट ऑफ’ जाहीर होईल.

Web Title: Nagpur boy Adwai Krishna came first from Maharashtra in the 'JEE' main examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.