नागपुरात तिसऱ्या दिवशीही आपली बस बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 01:30 AM2018-09-25T01:30:20+5:302018-09-25T01:31:06+5:30

महापालिका प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे सलग तिसऱ्या दिवशी आपली बस बंदच होती. यामुळे सोमवारी शहरातील नागरिकांना व विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागले. असे असूनही अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी याची दखल घेतली नाही. सार्वजनिक वाहतुकीविषयी असलेली अनास्था यातून स्पष्ट झाली.

In Nagpur, the bus stopped for the third day | नागपुरात तिसऱ्या दिवशीही आपली बस बंदच

नागपुरात तिसऱ्या दिवशीही आपली बस बंदच

Next
ठळक मुद्देमनपा प्रशासनाची उदासीन भूमिका : सलग तिसऱ्या दिवशी प्रवासी त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिका प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे सलग तिसऱ्या दिवशी आपली बस बंदच होती. यामुळे सोमवारी शहरातील नागरिकांना व विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागले. असे असूनही अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी याची दखल घेतली नाही. सार्वजनिक वाहतुकीविषयी असलेली अनास्था यातून स्पष्ट झाली. अशाच प्रकारातून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेली ग्रीन बससेवा बंद झाली आहे.
३२० शहर बसमधून दररोज १.५५ ते १.६० लाख प्रवासी प्रवास करतात. चौथा शनिवार व रविवारी सुटी असल्याने दोन दिवस फारशी अडचण झाली नाही. परंतु सोमवारी शाळा-महाविद्यालय, कार्यालय सुरू होते. अशा परिस्थितीत बस उपलब्ध नसल्याने नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागला. तीन रेड बस आॅपरेटरचे प्रत्येकी १५ कोटी महापालिकेकडे थकीत आहेत. डिझेल भरण्यासाठी पैसे नसल्याने त्यांनी बससेवा बंद केली आहे. महापालिकेची सर्वसाधारण सभा असल्याने सोमवारी दिवसभर अधिकारी व पदाधिकारी व्यस्त होते. वृत्त लिहिपर्यंत संपावर कोणत्याही प्रकारचा तोडगा निघालेला नव्हता.
शहर बससेवा पूर्ववत व्हावी, यासाठी शनिवारपासून आॅपरेटर व प्रशासन यांच्यात समन्वय घडवून आणण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु महापालिकेचे अधिकारी ऐकायला तयार नसल्याचे परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांनी सांगितले. डिझेल भरण्यासाठी पैसे नसल्याने आॅपरेटरने बस बंद केली आहे. सोमवारी सकाळी यासंदर्भात अधिकाºयांशी चर्चा केली. तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
सत्तापक्ष नेते संदीप जोशी म्हणाले, आयुक्तांसोबत चर्चा केली आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती विचारात घेता आॅपरेटरला प्रत्येकी एक कोटी देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु आॅपरेटरकडून प्रत्येकी तीन कोटींची मागणी होत आहे. तिकिटांचे पैसे आॅपरेटरलाच दिले जातात. यावर लवकरच तोडगा काढला जाईल. सभागृहात एकाही सदस्याने बस बंद असल्याचा मुद्दा उपस्थित केला नाही. सभागृहाचे कामकाज संपल्यानंतर विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी यावर नाराजी व्यक्त केली.

कामगार सेनेचे निवेदन
भारतीय कामगार सेनेचे जिल्हा संघटक बंडू तळवेकर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने आॅपरेटरच्या संपाबाबत महापौर नंदा जिचकार यांना निवेदन देऊ न चर्चा केली. यावेळी त्यांनी आॅपरेटरवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

बसभाड्यात २५ टक्के वाढ
आपली बस बंद असतानाच सोमवारी महापालिका सभागृहात आपली बसच्या भाड्यात वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे आता २५ टक्के भाडेवाढ होणार आहे. आठ रुपये तिकिटासाठी १० रुपये द्यावे लागतील. त्याशिवाय वेगवेगळ्या टप्प्यासाठी भाडेवाढ करण्यात आली आहे. भाडेवाढीमुळे महापालिकेला दर महिन्याला एक कोटी अतिरिक्त महसूल प्राप्त होणार आहे. सध्या बसभाड्यातून दर महिन्याला ५.२५ कोटींचे उत्पन्न होते. काही महिन्यापूर्वी एसटी बसभाड्यात १८ टक्के वाढ करण्यात आली होती. आपली बसच्या भाड्यात ८ सप्टेंबर २०१४ पासून वाढ करण्यात आलेली नव्हती. प्रस्तावात म्हटले आहे की, मार्च २०१७ मध्ये डिझेल प्रति लिटर ६२.५७ रुपये होेते. एप्रिल २०१८ मध्ये डिझेलचे दर ६९.१२ रुपयावर पोहचले. सध्या प्रति लिटर ७० रुपयाहून अधिक दर आहे. दुसरीकडे मिडी बसला प्रति किलोमीटर ४६.९० रुपये व स्टॅडर्ड बसला प्रति किलोमीटर ५२.१६ रुपये दिले जातात.

Web Title: In Nagpur, the bus stopped for the third day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.