नागपूर विमानतळावर सोने, सिगारेटची तस्करी पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 01:42 AM2018-03-31T01:42:26+5:302018-03-31T01:42:44+5:30
केंद्रीय अबकारी विभागाने शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या कारवाईत ३१ लाख रुपये किमतीच्या विदेशी वस्तूसह सोने जप्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्रीय अबकारी विभागाने शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या कारवाईत ३१ लाख रुपये किमतीच्या विदेशी वस्तूसह सोने जप्त केले. यात ११.७८ लाख रुपयांचे ४२० ग्राम सोनं, १० लाख रुपयांच्या ५०० पॅकेट विदेशी सिगारेट व ९.६८ लाखाचे इम्पोर्टेड केसर आहे. दुबईहून आलेल्या विमानात दोन पुरुष व एक महिला संशयास्पद स्थितीत अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांना आढळून आले. त्यांची चौकशी केली असता, त्यांच्याकडून हे साहित्य जप्त करण्यात आले. त्यांची विचारपूस करून सोडून देण्यात आल्याची माहिती आहे. ही महिला मुंबई येथील रहिवासी असून, दोन पुरुष हे वर्धा जिल्ह्यातील रहिवासी आहे.