नागपूर शहरात ३ लाख ३६ हजार ६८६ नळधारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 09:50 PM2018-05-23T21:50:19+5:302018-05-23T21:50:35+5:30
नागपूर शहराची लोकसंख्या ३० लाख आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेतून शहराला पेंच प्रकल्पातून दररोज ६४० एमएलडी पाणीपुरवठा होतो. ६७६ किलोमीटर लांबीच्या पाईपलाईन असून यातील ६०० कि.मी. लाईन बदलण्यात आली आहे. शहरात ३ लाख ३६ हजार ६८६ नळधारक आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहराची लोकसंख्या ३० लाख आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेतून शहराला पेंच प्रकल्पातून दररोज ६४० एमएलडी पाणीपुरवठा होतो. ६७६ किलोमीटर लांबीच्या पाईपलाईन असून यातील ६०० कि.मी. लाईन बदलण्यात आली आहे. शहरात ३ लाख ३६ हजार ६८६ नळधारक आहेत. यात २ लाख ४५ हजार १८ निवासी, ३३७४ संस्था, ४ हजार ४५० व्यावसायिक तर ८१ हजार ९९३ झोपडपट्टीतील नळधारक आहेत. यातील ३ लाख २० हजार ग्राहकांकडे पाण्याचे मीटर आहे. शहरातील यातील २७० एमएलडी पाण्याचे बिलिंग होत नाही. पाणी बिलाची वसुली ४५ टक्के आहे. नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात १४०१ पाणीपुरवठा योजना आहे. एकदोन योजनांचा अपवाद वगळता मीटरद्वारे पाणीपुरवठा होत नाही. बहुसंख्य नळपाणीपुरवठा योजनेत विहिरीवरून पाणीपुरवठा होतो. पाणी बिलाची वसुली ६० टक्के आहे. पाणीपुरवठा वा पाण्याची गळती याचे मोजमाप होत नाही. याची आकडेवारी उपलब्ध नसल्याचे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विजय टाकळीकर यांनी सांगितले.
पाणीपुरवठा योजना (नागपूर शहर)
लोकसंख्या- ३० लाख
दररोज होणारा पाणीपुरवठा -६४० एमएलडी
पाण्याची एकूण पाईप लाईन - ६७६ कि.मी.
नवीन बदलण्यात आलेली पाईप लाईन - ६०० कि.मी.
नळजोडणीधारक - ३,३६,६७६
पाणी मीटरधारक - ३,२०,०००
बिलिंग होत नसलेले पाणी -२७० एमएलडी
पाणी बिलाची वसुली - ४५ टक्के