नागपूर शहर बस कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीत घोटाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 12:45 AM2018-03-22T00:45:27+5:302018-03-22T00:45:41+5:30
भविष्य निर्वाह निधी हा कामगारांचा भविष्याचा आधार असतो. कामगारांचा भविष्य निर्वाह निधी जमा करणे आवश्यक आहे. परंतु महापालिके च्या आपली बस सेवेचे संचालन करणाऱ्या ट्रॅव्हल्स टाइम कंपनीने नियमानुसार कामगारांच्या वेतनातून कपात करून व तितकीच रक्क्म कंपनीकडून जमा करणे अपेक्षित आहे. मात्र कंपनीकडून कामगारांच्या खात्यात महिन्याला फक्त १६८ रुपये जमा केले जातात. यात कोट्यवधीचा घोटाळा असल्याच्या आरोप भारतीय कामगार सेनेने केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भविष्य निर्वाह निधी हा कामगारांचा भविष्याचा आधार असतो. कामगारांचा भविष्य निर्वाह निधी जमा करणे आवश्यक आहे. परंतु महापालिके च्या आपली बस सेवेचे संचालन करणाऱ्या ट्रॅव्हल्स टाइम कंपनीने नियमानुसार कामगारांच्या वेतनातून कपात करून व तितकीच रक्क्म कंपनीकडून जमा करणे अपेक्षित आहे. मात्र कंपनीकडून कामगारांच्या खात्यात महिन्याला फक्त १६८ रुपये जमा केले जातात. यात कोट्यवधीचा घोटाळा असल्याच्या आरोप भारतीय कामगार सेनेने केला आहे.
संघटनेच्या शिष्टमंडळाने बुधवारी भविष्य निर्वाह निधी विभागाचे आयुक्त अनिमेष मिश्रा यांना निवेदन दिले. यात संघटनेचे जिल्हा संघटक बंडू तळवेकर, संघटनेचे अध्यक्ष भाऊ राव रेवतकर, सचिव अंबादास शेंडे, मनोज कारोकार व विशाल राऊ त यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.
ट्रॅव्हल्स टाइम कंपनीत ३२० कामगार आहेत. कामगारांच्या वेतनातून दर महिन्याला १२ टक्के ईपीएफ कपात करून व तितकीच रक्कम कंपनीने जमा करणे अपेक्षित आहे. त्यानुसार दर महिन्याला प्रत्येक कर्मचाऱ्याच्या वेतनातून ११३९ रुपये कपात होेणे अपेक्षित आहे. परंतु प्रत्येक कामगाराचे महिन्याला १६८ रुपये जमा केले जातात. म्हणजेच एका कामगारामागे महिन्याला १९२६ रुपयांचा घोटाळा केला जात आहे. अशाप्रकारे ३२० कामगारांचे महिन्याला ६ लाख १६ हजार ३२० रुपये होतात. गेल्या सहा महिन्यात कंपनीने ३६ लाख ९७ हजार ९२० रुपयांचा घोटाळा केला आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्त व परिवहन व्यवस्थापकांना माहिती दिल्यानंतरही कोणत्याही स्वरूपाची कार्यवाही केलेली नाही. तसेच कंपनीने ईएसआयची रक्कम न भरल्याने कामगारांना उपचार मिळत नसल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणले. दरम्यान कंपनीच्या विरोधात बेलतरोडी पोलिसात तक्रार देण्यात आल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.