वंदे मातरम् स्पर्धेमुळे नागपूर शहराला वेगळी ओळख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 12:47 AM2018-08-15T00:47:51+5:302018-08-15T00:48:47+5:30
महापालिकेतर्फे मागील २२ वर्षापासून आयोजित करण्यात येणाऱ्या महापौर चषक वंदे मारतम् समूहगान स्पर्धेमुळे शहराचे स्थान उंचावत आहे. दिवसेंदिवस स्पर्धेची गुणवत्ता वाढत असल्याने शहराला वेगळी ओळख मिळाली आहे, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी मंगळवारी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेतर्फे मागील २२ वर्षापासून आयोजित करण्यात येणाऱ्या महापौर चषक वंदे मारतम् समूहगान स्पर्धेमुळे शहराचे स्थान उंचावत आहे. दिवसेंदिवस स्पर्धेची गुणवत्ता वाढत असल्याने शहराला वेगळी ओळख मिळाली आहे, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी मंगळवारी केले.
महापालिके तर्फे रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित महापौर चषक वंदे मातरम् समूहगान स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात महापौर बोलत होत्या. स्पर्धेच्या अंतिम फेरीत इयत्ता ९ ते १० वी या गटात मॉडर्न पब्लिक स्कूल कोराडी रोड, ६ ते ८ वी गटात द रॉयल गोंडवाना पब्लिक स्कूल शंकरपूर व पहिली ते पाचवी गटात द ब्लाईंड बॉईज इन्स्टिट्यूटने बाजी मारीत गटनिहाय विजेतेपद पटकावले. विजेत्यांना महापौरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. स्पर्धेत मनपाच्या १९ व इतर ८२ अशा एकूण १०१ शाळांनी सहभाग घेतला.
बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, शिक्षण समिती उपसभापती भारती बुंदे, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, देवेन दस्तुरे यांच्यासह अंतिम फेरीचे परीक्षक शहरातील सुप्रसिद्ध गायक एम.ए. कादर, सुप्रसिद्ध गायिका आकांक्षा नगरकर, आशुतोष पळसकर उपस्थित होते.
प्रथम क्रमांक विजेत्यांना १० हजार पुरस्कार
महापौर चषक वंदे मातरम् समूहगान स्पर्धेमध्ये इयत्ता ९ ते १० वी या गटात मॉडर्न पब्लिक स्कूल कोराडी रोडने प्रथम, भवन्स भगवानदास पुरोहित विद्यामंदिर त्रिमूर्तीनगरने द्वितीय, ललिता पब्लिक स्कूल वर्धमाननगर कोराडी रोड संघाने तृतीय क्रमांक प्राप्त केला. याशिवाय मनपाच्या बॅ. शेषराव वानखेडे विद्यानिकेतनला उत्तेजनार्थ पुरस्कार प्रदान करण्यात आले. ६ ते ८ वी या गटात द रॉयल गोंडवाना पब्लिक स्कूल शंकरपूर, भवन्स भगवानदास पुरोहित विद्यामंदिर श्रीकृष्णनगर, साऊथ पॉर्इंट स्कूल ओंकारनगरने अनुक्रमे पहिले, दुसरे व तिसरे स्थान राखले. संजुबा हायस्कूल बहादुराने उत्तेजनार्थ व नेताजी मार्के ट हिंदी माध्यमिक मनपा शाळेने प्रोत्साहनपर पुरस्कार पटकाविला. पहिली ते पाचवीच्या गटात द ब्लार्इंड बॉईज इन्स्टिट्यूटने पहिला, जुना सुभेदार ले-आऊट मानेवाडा येथील दुर्गानगर उच्च प्राथामिक शाळेने दुसरा व द रॉयल गोंडवाना पब्लिक स्कूल शंकरपूर संघाने तिसरा क्रमांक मिळविला. या गटात ग्रेट ब्रिटेन कॉन्व्हेंट शांतिनगर व आदर्श संस्कार विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने क्रमश: उत्तेजनार्थ व प्रोत्साहन पुरस्कार मिळविले. तिन्ही गटातील प्रथम क्रमांक पटकाविणाºया संघांना प्रत्येकी १० हजार रुपये रोख पुरस्कार व विजयी चषक प्रदान करण्यात आले. दुसºया स्थानावरील विजेत्यांना सात हजार रोख तर तिसºया क्रमांकावरील विजेत्यांना पाच हजार रुपये रोख पुरस्कारासह चषक प्रदान करून गौरविण्यात आले. प्रोत्साहन पुरस्कार विजेत्या शाळांना प्रत्येकी तीन हजार रुपये रोख बक्षीस देण्यात आले.
स्पर्धेच्या आयोजनासाठी परिश्रम घेणारे क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी, माधुरी धवड, संध्या पवार, लता कनाटे व मधु कराड यांना नंदा जिचकार यांच्या हस्ते गौरविण्यात आले.