नागपूर शहर राष्ट्रवादीचे नवा गडी नवे राज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 08:21 PM2018-07-27T20:21:02+5:302018-07-27T20:24:48+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचीे ७० पदाधिकाऱ्यांचा समावेश असलेली नवी शहर कार्यकारिणी शहर अध्यक्ष अनिल अहीरकर यांनी शुक्रवारी जाहीर केली. कार्यकारिणीत भाजपा, जनता दल व काँग्रेसमधून आलेल्या पदाधिकाऱ्यांनाही महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. येत्या १५ दिवसात आणखी ३० पदाधिकाऱ्यांची विस्तारित कार्यकारिणी जाहीर केली जाईल व तीत भाजपासह इतर पक्षातून आलेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश असेल, असा दावाही त्यांनी केला.

Nagpur city NCP's new leader new rule | नागपूर शहर राष्ट्रवादीचे नवा गडी नवे राज

नागपूर शहर राष्ट्रवादीचे नवा गडी नवे राज

Next
ठळक मुद्दे७० पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी जाहीर : संघटन बांधणीवर भर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचीे ७० पदाधिकाऱ्यांचा समावेश असलेली नवी शहर कार्यकारिणी शहर अध्यक्ष अनिल अहीरकर यांनी शुक्रवारी जाहीर केली. कार्यकारिणीत भाजपा, जनता दल व काँग्रेसमधून आलेल्या पदाधिकाऱ्यांनाही महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. येत्या १५ दिवसात आणखी ३० पदाधिकाऱ्यांची विस्तारित कार्यकारिणी जाहीर केली जाईल व तीत भाजपासह इतर पक्षातून आलेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश असेल, असा दावाही त्यांनी केला.
नव्या कार्यकारिणीमध्ये सहा विभागीय अध्यक्षांसह १५ उपाध्यक्ष, १८ सरचिटणीस, ११ सचिव, १४ संघटन सचिव, ४ सहसचिव, ४ कार्यकारिणी सदस्यांसह माजी मंत्री अनिल देशमुख, रमेश बंग, यांच्यासह आ. प्रकाश गजभिये, दीनानाथ पडोळे, शब्बीर विद्रोही, दिलीप पनकुले, दुनेश्वर पेठे, प्रवीण कुंटे, रमेश फुले , जानबाजी मस्के, ईश्वर बाळबुधे या ज्येष्ठ नेत्यांना निमंत्रित सदस्य म्हणून स्थान देण्यात आले आहे. येत्या काळात पक्ष संघटन बळकट करून जनतेच्या प्रश्नांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरेल, असे अहीरकर यांनी यावेळी सांगितले. सलील देशमुख यांनी यापुढील सर्व निवडणुका मतपत्रिकेद्वारे घेण्याची मागणी केली.
कार्यकारिणी पुढील प्रमाणे - कोषाध्यक्ष: वीरेंद्र यादुका, प्रवक्ता : राजकुमार नागुलवार, प्रचार प्रमुख : प्रा. गजानन कुऱ्हाडकर. उपाध्यक्ष : बजरंगसिंग परिहार, चरणजितसिंग चौधरी, महादेवराव फुके, सुनील लांजेवार, प्यारुद्दीन काजी, अशोक राऊ त, राजेश फुले , बाबाराव गावंडे, नुतन रेवतकर , संजय शेवाळे, मोरेश्वर जाधव, श्रीकांत शिवणकर, अशोक फुके, धनंजय देशमुख, अनिल पौनीपगार . सरचिटणीस : जतिन मलकान, जाकीर शेख, उर्वशी गिरडकर, वाजीद शेख, अनिल खडगी, अविनाश शेरेकर, अरविंद ढेेंंगर, हेमंत भोतमांगे, आकाश थेटे, लक्ष्मी सावरकर, उषा चौधरी, हेमंत डोरले, विक्रांत तांबे, प्रमिला टेंभेकर, संतोष सिंग, रवींद्रसिंग मुल्ला, संदीप मेंढे, वीरेंद्र निखार. सचिव : नंदकिशोर माहेश्वरी, संजय धापोडकर, राजेश शर्मा, मानसी स्मार्त, करुणाकांत दुबे, ज्योती लिंगायत, सुनिता खांडेकर, अशरफ खान, योगेश पिल्ले, शाहबाज खान, जावेद खान. संघटन सचिव : प्रकाश लिखानकर, भरत शर्मा, शेख इसहाक मन्सुरी, श्रद्धा शाहू, प्रकाश मेश्राम, रूपेश पन्नासे, नरेंद्र सारवे, चंद्रशेखर तिडके,संग्राम पनकुले, माणिक मोरस्कर, श्यामबिहारी पांडेय, बाळबुधे गुरुजी, जतीन झाडे, संजय नाकाडे. सहसचिव : धीरूभाई पटेल, अमरीश ढोरे, चंद्रकांत रामटेके, नरेश अग्रवाल, कार्यकारिणी सदस्य : डॉ़ तुळशीराम मेंढेकर, रियाज शेख, संजय वाणी, गोपाळ ठाकूर.
विधानसभेच्या दोन जागांवर दावा
अहीरकर म्हणाले, आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस- राष्ट्रवादी एकत्रित लढेल व दोन्ही पक्षांना चांगले यश मिळेल. नागपुरात पक्षाची ताकद वाढविली जात आहे. शहरात राष्ट्रवादीला दोन जागा मिळाव्या, असा प्रस्ताव काँग्रेसकडे दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

Web Title: Nagpur city NCP's new leader new rule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.