लोकमत महामॅरेथॉनमध्ये पहाटेच्या प्रसन्न हवेत आबालवृद्धांसह सहर्ष धावले नागपूरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 09:39 AM2018-02-11T09:39:48+5:302018-02-11T09:41:58+5:30
लोकमत वृत्तपत्राच्या वतीने व भोजवानी फूड्स प्रस्तुत नागपूर महामॅरेथॉन स्पर्धेला रविवारी पहाटे साडेसहाच्या ठोक्याला अत्यंत हर्षोल्हासात सुरुवात झाली.
Next
ठळक मुद्देमहामॅरेथॉनची शानदार सुरुवातहजारोंच्या संख्येने फुलून गेले कस्तुरचंद पार्क
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: लोकमत वृत्तपत्राच्या वतीने व भोजवानी फूड्स प्रस्तुत नागपूर महामॅरेथॉन स्पर्धेला रविवारी पहाटे साडेसहाच्या ठोक्याला अत्यंत हर्षोल्हासात सुरुवात झाली. मी धावतो माझ्यासाठी हा संदेश घेऊन धावण्यासाठी उत्सुक असलेले नागपुरातील हजारो नागरिक पहाटेच कस्तुरचंदपार्कवर जमा झाले होते. या निमित्ताने राज्याच्या विविध भागातील धावपटू नागपुरात दाखल झाले आहेत.
रविवारी पहाटे महामॅरेथॉनला प्रारंभ झाला. यात तरुण-तरुणी, धावपटू, वृद्ध पुरुष, स्त्रिया, दिव्यांग असे सर्वच सहभागी झाले होते. महामॅरेथॉनचे अधिक वृत्त लवकरच देत आहोत.