शहर आरटीओने गाठले १०० टक्के ‘टार्गेट’, १५३ कोटींचा महसूल संकलीत
By सुमेध वाघमार | Published: April 3, 2023 03:15 PM2023-04-03T15:15:32+5:302023-04-03T15:16:26+5:30
पूर्व आरटीओचे ९७ टक्के उद्दीष्ठ प्राप्त
नागपूर : प्रादेशिक परिवहन कार्यालय ( आरटीओ) नागपूर शहरने महसुलाचे उद्दीष्ट (टार्गेट) ओलांडत ९९.९८ टक्के अर्थात १५३ कोटी ९९ लाखांचा महसूल संकलीत केला. तर पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने ९७.३५ टक्के म्हणजे, १७७ कोटी ७६ लाखांचा महसूल प्राप्त केला आहे.
वाहनसंख्येच्या प्रमाणात वाहनधारकांकडून होणारे नियमभंग, तसेच लायसन्स व रजिस्ट्रेशन अशा विविध करांपोटी कोट्यवधी रु पयांचा महसूल जमा करणाºया आरटीओ कार्यालयात अडचणींचा डोंगर असताना त्याकडे डोळेझाक करत राज्याकडून महसुलाचे टार्गेट न विसरता दरवर्षी वाढवून दिले जाते. नुकतेच सरलेले आर्थिक वर्षदेखील त्याला अपवाद नव्हते. नागपूर शहर आरटीओ कार्यालयाला (एमएच३१) परिवहन विभागाकडून १५४ कोटी २ लाखांचे लक्ष्य दिले होते. त्या तुलनेत १५३ कोटी ९९ लाखांचे उद्दीष्ट प्राप्त केले. मागील वर्षी या कार्यालयाने १०७.२५ टक्के लक्ष्य गाठले होते. पूर्व आरटीओ कार्यालयाला (एमएच ४९) या वर्षी २०२ कोटी ६१ लाखांचे लक्ष्य होते. कार्यालयाने १९७ कोटी २५ लाखांचे लक्ष्य गाठले. मागील वर्षी १०३.६० टक्के उद्दीष्ट पूर्ण केले.
-तिन्ही कार्यालयाची कामगिरी ९७ टक्के
शहर आरटीओ कार्यालयांतर्गत पूर्व व वर्धा आरटीओ कार्यालयही येतात. या वर्षी तिन्ही कार्यालयांना ४१६ कोटी ५८ लाखांचे लक्ष्य दिले होते. त्या तुलनेत ९७.१७ टक्के म्हणजे, ४०४ कोटी ८० लाखांचे उद्दीष्ट गाठण्यात यश मिळाले.
- ओव्हरलोड वाहनांकडून ३.५ कोटींचा महसूल
वर्षभरात ‘ओव्हरलोड’ म्हणजे क्षमतेपेक्षा जास्त मालवाहतूक करणाºयांकडून जवळपास ३.५ कोटींचा महसूल प्राप्त झाला. या शिवाय, लवकरच पर्यावरण व थकीत कर तपासणी मोहिम हाती घेतली जाणार आहे. यातूनही मोठ्या प्रमाणात महसूल मिळण्याची शक्यता आहे. ज्यांनी हा कर भरलेला नाही त्यांनी तो तातडीने भरणे गरजेचे आहे.
- रविंद्र भूयार, प्रादेशिक परिवहन अधिकारी नागपूर शहर