विदर्भात नागपूर सर्वाधिक थंड : पारा घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 11:28 PM2019-11-11T23:28:20+5:302019-11-11T23:29:22+5:30

सोमवारी संपूर्ण विदर्भात नागपूर शहर सर्वाधिक थंड राहिले. येथे रात्रीच्या तापमानात मागील २४ तासांमध्ये १.४ अंश सेल्सिअसवरून घट होऊन ते १५.८ सेल्सिअसपर्यंत खाली घसरले.

Nagpur coldest in Vidarbha: mercury decreases | विदर्भात नागपूर सर्वाधिक थंड : पारा घटला

विदर्भात नागपूर सर्वाधिक थंड : पारा घटला

Next
ठळक मुद्देरात्रीचे तापमान पोहचले १५.८ अंशावर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील आठवड्यातील ढगाळी वातावरण दूर होऊन आकाश स्वच्छ झाले आहे, सोबतच शहरातील तापमानाच्या पाऱ्यातही घट व्हायला सुरूवात झाली आहे. सोमवारी संपूर्ण विदर्भात नागपूर शहर सर्वाधिक थंड राहिले. येथे रात्रीच्या तापमानात मागील २४ तासांमध्ये १.४ अंश सेल्सिअसवरून घट होऊन ते १५.८ सेल्सिअसपर्यंत खाली घसरले.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्यात नागपुरात तापमान दिवसा अधिक आणि रात्री कमी असते. रात्रीच्या तापमानापेक्षा दिवसाचे तापमान जवळपास दुप्पट असते. सकाळचे उन्ह कडक आणि कोवळे असते. सध्या आकाश नीरभ्र आहे. यामुळे पाऱ्यामध्ये घसरण होत आहे. नोव्हेंबरचा दुसऱ्या आठवड्यात तापमानात पुन्हा घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. उत्तर भारतामध्ये सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे मध्य भारतामधील हवेत आर्द्रता निर्माण होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. पुढील दोन दिवसात हा बदल जाणवलेला अनुभवता येणार आहे.
नागपुरात सोमवारी किमान तापमान ३१.५ अंश सेल्सिअस असे सामान्य होते. दिवसा तापमान ३० सेल्सिअसच्या खाली आल्यावर हलक्या थंडीचा अनुभव सकाळी येण्याची शक्यता आहे. सध्या रात्री पारा सामान्यापेक्षा एका अंशाने खाली १५.८ पर्यंत घसरला आहे. त्यामुळे रात्रीच्या वातावरणात गारठा जाणवायला लागला आहे.
विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली (२१ अंश सेल्सिअस) वगळले तर अन्य जिल्ह्यात पारा २० अंशाच्या खाली उतरला आहे. अन्य जिल्ह्यांमध्ये दिवसाचे तापमान सामान्य स्तराच्या जवळपास आहे. अकोलामध्ये किमान तापमान १८.२, अमरावतीमध्ये १९.०, बुलडाणा १७, ब्रह्मपुरी १९.१, गोंदिया १६.८, वर्धा १८.६, वाशिम १९.२ तर यवतमाळमध्ये १७.४ अंश सेल्सिअस नोंद झाली आहे.

कडक थंडी पडणार
विदर्भात पाऊस ज्या प्रमाणे एक महिना विलंबाने आला, नंतर मात्र बराच काळ थांबून थांबून मुक्कामाला राहिला तशीच थंडीही थोडी विलंबाने मात्र बरीच अधिक पडण्याची शक्यता आहे. डिसेंबर आणि जानेवारी हे दोन्ही महिने पूर्णत: थंडीचेच असतील, असाही अंदाज आहे.

Web Title: Nagpur coldest in Vidarbha: mercury decreases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.