१९ व्या स्वाध्यायमध्ये नागपूर ढेपाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:08 AM2021-03-24T04:08:04+5:302021-03-24T04:08:04+5:30

नागपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी शासनाकडून विविध पर्यायांद्वारे शिक्षण सुरू ठेवण्याचे प्रयत्न ...

Nagpur collapsed in the 19th Swadhyay | १९ व्या स्वाध्यायमध्ये नागपूर ढेपाळले

१९ व्या स्वाध्यायमध्ये नागपूर ढेपाळले

Next

नागपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी शासनाकडून विविध पर्यायांद्वारे शिक्षण सुरू ठेवण्याचे प्रयत्न झाले. यातून विद्यार्थी कसे शिकत आहे? या मुलांनी स्वत:चे मूल्यांकन करावे, यासाठी एससीईआरटी, एलएफई व कॉन्व्हीजिनस कंपनीतर्फे स्वाध्याय उपक्रम राबविला जात आहे. सध्या स्वाध्याय मालिकेतील हा १९ वा स्वाध्याय सुरू आहे. सुरुवातीला स्वाध्यायमध्ये नागपूर जिल्ह्यासह विभाग राज्यात अग्रणी होता. पण १९ व्या स्वाध्यायमध्ये नागपूर जिल्हा खूप मागे गेला आहे.

‘स्टुडंट व्हॉट्सअ‍ॅप बेस्ड डिजिटल होम असेसमेंट’ (स्वाध्याय) योजनेची सुरुवात ३ नोव्हेंबर २०२० रोजी करण्यात आली. प्रश्नमंजुषेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची उजळणी व्हावी, हा या स्वाध्याय उपक्रमाचा उद्देश होता. वर्ग १ ते १० वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम १९ व्या टप्प्यात पोहचला आहे. सध्या १९ वा स्वाध्याय विद्यार्थ्यांना व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून उपलब्ध झाला आहे. गेल्या तीन दिवसात जिल्ह्यात १६,५९१ विद्यार्थ्यांनी स्वाध्याय सोडविला आहे.

स्वाध्याय उपक्रमाचे समन्वयक रवींद्र रमतकर यांनी सांगितले की, उपक्रमाची सुरुवात झाली तेव्हा नागपूर विभाग हा सर्वात पुढे होता. या उपक्रमात आम्ही सहाही जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी, डायटचे प्राचार्य, नोडल अधिकारी व संपर्क अधिकाऱ्यांना जोडून घेतले होते. नागपूर विभागात उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठीही आम्ही स्वाध्याय उपक्रम सुरू केला होता. विभागीय आयुक्त, सर्व जिल्ह्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे पहिल्या १० स्वाध्यायमध्ये नागपूर विभाग राज्यात आघाडीवर होता. चंद्रपूरमध्ये स्वाध्याय सोडविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ८० हजारावर गेली होती.

- स्वाध्याय हा अध्ययन निष्पत्ती आधारित कार्यक्रम आहे. ही एकप्रकारची नियमित परीक्षा आहे. स्वाध्याय सोडविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे. ग्रामीण भागात ऑनलाईनची थोडी समस्या आहे. एक चळवळ म्हणून जर शिक्षकांनी या उपक्रमात लक्ष घातल्यास पुन्हा नागपूर जिल्हा वरचढ ठरू शकतो. नागपूर जिल्हा सध्या काहीसा माघारलेला असला तरी, जिल्ह्याचा क्रम वाढविण्यासाठी आमचा प्रयत्न आहे.

रवींद्र रमतकर, समन्वयक, स्वाध्याय उपक्रम

- १९ व्या स्वाध्यायची नागपूर विभागाची स्थिती

नागपूर - १६,५९१

चंद्रपूर - ६३,२३९

भंडारा - ५,४२६

गोंदिया - ११,४६९

गडचिरोली - ३,१२५

वर्धा - १८,९८७

Web Title: Nagpur collapsed in the 19th Swadhyay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.