नागपूरचे जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात प्रथम, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी इटनकर पुरस्कृत

By आनंद डेकाटे | Updated: February 27, 2025 20:58 IST2025-02-27T20:58:09+5:302025-02-27T20:58:29+5:30

Nagpur News: राज्यात १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेच्या अंतरिम प्रगतीच्या मूल्यमापणामध्ये राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमधून नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला.

Nagpur Collectorate first in the state, Collector Itankar awarded by Chief Minister Fadnavis | नागपूरचे जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात प्रथम, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी इटनकर पुरस्कृत

नागपूरचे जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात प्रथम, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी इटनकर पुरस्कृत

- आनंद डेकाटे 
नागपूर - राज्यात १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेच्या अंतरिम प्रगतीच्या मूल्यमापणामध्ये राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमधून नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना पुरस्कृतकरीत त्यांचे अभिनंदन केले.

राज्यस्तरीय, विभागस्तरीय व जिल्हास्तरीय प्रशासन हे लोकाभिमूख, गतिमान व पारदर्शक चालावे यासाठी ७ जानेवारी २०२५ ते १६ एप्रिल २०२५ या कालावधीत राज्यात १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहीमेचा अंतरिम प्रगतीचा आढावा गुरूवार २७ फेब्रुवारी रोजी घेण्यात आला. राज्यातील सर्व मंत्रालयीन विभागांचे, अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, आयुक्त, संचालक, पोलीस आयुक्त, विभागीय आयुक्त, पोलीस परिक्षेत्र, महानिरीक्षक, उपमहानिरीक्षक, जिल्हाधिकारी, महानगरपालिका, आयुक्त, पोलीस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कामगिरींचे, कार्यालयांची,संकेतस्थळे, सुकर जीवनमान, स्वच्छता, तक्रार निवारण, अधिकारी, कर्मचारी प्रशिक्षण, सेवा विषयक बाबी, कृत्रिम बुद्धिमत्ता, तंत्रज्ञानाचा वापर (ए. आय), नाविण्यपूर्ण उपक्रम इत्यादी निकषांच्या आधारे मूल्यमापण करण्यात आले. या अंतरिम प्रगतीच्या मूल्यमापणामध्ये राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमधून नागपूरम्या जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला.

Web Title: Nagpur Collectorate first in the state, Collector Itankar awarded by Chief Minister Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर