खबरदार! होळीत रस्त्यावर गोंधळ घालाल तर थेट तुरुंगात जाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2022 06:11 PM2022-03-16T18:11:35+5:302022-03-16T18:27:41+5:30

शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याचं आव्हान पोलिसांपुढे आहे. यावेळी, सर्व घटकांनी मदत करण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

Nagpur Commissioner of Police Amitesh Kumar's appeals to maintain peace during festival | खबरदार! होळीत रस्त्यावर गोंधळ घालाल तर थेट तुरुंगात जाल

खबरदार! होळीत रस्त्यावर गोंधळ घालाल तर थेट तुरुंगात जाल

Next
ठळक मुद्देनागपूर पोलीसांचा इशारा

नागपूर : कोरोनाच्या सावटानंतर तब्बल दोन वर्षांनी होळीचा सण साजरा करायला मिळत असल्याने नागरिक खुश आहेत. रंगबिरंगी गुलाल, पिचकारी, टोप्या, मुखवट्यांनी दुकाने सजली आहेत. तर, यावर्षी १५ वर्षानंतर मुस्लीम बांधवांचा शब्बे बरात देखील एकाच दिवशी असल्याने शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याचं आव्हान पोलिसांपुढे आहे. यावेळी, सर्व घटकांनी मदत करण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. 

या पार्श्वभूमीवर नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शांतता समितीची बैठक घेतली. फेब्रुवारीत नागपूर शहरात हत्येचा एकही गुन्हा दाखल झाला नव्हता. परंतू मार्च महिन्यात आतापर्यंत चार हत्येच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. होळी आणि शब्बे बारातचं निमीत्त साधून समाजातील काही विघातक वृत्ती यावेळी आपलं डोकं वर काढू शकतात. यावर तोडगा म्हणून आज बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला नागपूर पोलीस दलातील DCP, ACP आणि सर्व पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक तसेच सर्वधर्मीय नेत्यांचीही उपस्थिती होती.

यावेळी, सणासुदीच्या काळात कुठलीही अनुचित घटना घडू नये, याची सर्वांनी घबरदारी घेण्याचे आवाहन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले आहे. तसेच, गोंधळ घालणाऱ्याला थेट तुरुंगाचा रस्ता दाखवला जाईल, असेही ते म्हणाले.

होळी व धुलिवंदनासाठी राज्य सरकारने जाहीर केलेली नियमावली

रात्री १० वाजताच्या आत होळी पेटवणे बंधनकारक आहे.

होळीदरम्यान डीजे लावण्यावर कायदेशीर बंदी आहे.

दहावी तसेच बारावी वर्गाच्या परीक्षा सुरु असल्यामुळे लाऊडस्पीकरचा आवाज मोठा केल्यास कारवाई होईल.

होळी साजरी करताना मद्यपान तसेच बिभत्स वर्तन केल्यास कारवाई होईल.

होळी खेळताना महिला तसेच मुलींची खबरदारी घेण्याचे आवाहन.

कोणत्याही जातीधर्माच्या भावना दुखावतील अशा घोषणा देऊ नये.

धुलीवंदनाच्या दिवशी जबरदस्तीने रंग लावू नये, पाण्याचे फुगे फेकू नयेत.

Web Title: Nagpur Commissioner of Police Amitesh Kumar's appeals to maintain peace during festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.