नागपुरात सासऱ्याने केली सुनेची छेडछाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 12:51 AM2018-10-17T00:51:18+5:302018-10-17T00:52:04+5:30
मानकापूर परिसरात स्वयंपाकघरात काम करणाऱ्या सुनेची छेडछाड करणाऱ्या ५६ वर्षीय सासऱ्याच्या विरोधात पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मानकापूर परिसरात स्वयंपाकघरात काम करणाऱ्या सुनेची छेडछाड करणाऱ्या ५६ वर्षीय सासऱ्याच्या विरोधात पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
जलील अहमद सरफुद्दीन शेख असे आरोपीचे नाव असून, अन्य आरोपींमध्ये अतीक अहमद जलील अहमद (२७), आदिल अहमद जलील अहमद (२८), नफीस अहमद खलील अहमद (३२), आसिफ अहमद खलील अहमद (३०), अनिस अहमद खलील अहमद (२५) यांचा समावेश आहे. ही घटना तीन महिन्यांपूर्वी १४ जुलैला सकाळी ११.३० वाजता घडली.
प्राप्त माहितीनुसार, २९ वर्षीय सून स्वयंपाकघरात असताना जलील अहमद तिथे आले. तिला एकटे पाहून जलील अहमदने हात पकडून तिला अपमानित केले. याची माहिती सुनेने पतीला दिली. या घटनेने नाराज होऊन आरोपींनी तिला घरातून निघून जाण्याची आणि मारण्याची धमकी दिली. महिलेने तीन महिन्यांपूर्वी मानकापूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली होती. अखेर मानकापूर ठाण्याचे एएसआय विजय नाईक यांनी आरोपींविरुद्ध विभिन्न कलमाखाली गुन्हा नोंदविला.