नागपुरात ‘दयासागर’ ने केले उन्हाळ्यात वृक्षांचे संवर्धन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 06:51 PM2020-06-01T18:51:50+5:302020-06-01T18:53:16+5:30

रस्त्यांच्या विकासामुळे आणि मोठमोठ्या इमारतींमुळे शहरातील रस्त्यांवर मोजकेच वृक्ष शिल्लक आहे. पावसाळ्यापूर्वी सुटलेल्या वादळवाऱ्यामुळे मोठ्या संख्येने वृक्ष कोसळतात, कारण उन्हाळ्यात वृक्षांची निगा राखली जात नाही. शहरातील रस्त्यावरचे वृक्ष जगविण्यासाठी नागपुरातील ‘दयासागर’ उन्हाळ्यात वृक्षांचे संवर्धन करीत आहे. दरवर्षी दक्षिण नागपूर व परिसरातील रस्त्यावरील वृक्षांना उन्हाळ्याच्या दिवसात पाणी देऊन त्यांना जगविण्याचा प्रयत्न दयासागर करीत आहे.

In Nagpur, 'Dayasagar' did tree conservation in summer | नागपुरात ‘दयासागर’ ने केले उन्हाळ्यात वृक्षांचे संवर्धन

नागपुरात ‘दयासागर’ ने केले उन्हाळ्यात वृक्षांचे संवर्धन

Next
ठळक मुद्देरस्त्यावरील वृक्षांना पाणी देऊन जगविले

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रस्त्यांच्या विकासामुळे आणि मोठमोठ्या इमारतींमुळे शहरातील रस्त्यांवर मोजकेच वृक्ष शिल्लक आहे. पावसाळ्यापूर्वी सुटलेल्या वादळवाऱ्यामुळे मोठ्या संख्येने वृक्ष कोसळतात, कारण उन्हाळ्यात वृक्षांची निगा राखली जात नाही. शहरातील रस्त्यावरचे वृक्ष जगविण्यासाठी नागपुरातील ‘दयासागर’ उन्हाळ्यात वृक्षांचे संवर्धन करीत आहे. दरवर्षी दक्षिण नागपूर व परिसरातील रस्त्यावरील वृक्षांना उन्हाळ्याच्या दिवसात पाणी देऊन त्यांना जगविण्याचा प्रयत्न दयासागर करीत आहे.
दयासागर वेलफेअर असोसिएशन ही एक समाजिक संस्था आहे. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी विविध उपक्रम संस्थेकडून राबविण्यात येते. महापालिका व विविध संस्थांच्या माध्यमातून रस्त्याच्या कडेला वृक्ष लावण्यात आली आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात रस्त्याच्या कडेला असलेल्या वृक्षांकडे कुणीही लक्ष देत नाही. पाणी न मिळाल्यामुळे अनेक वृक्ष मरूनही जातात. दयासागर वेलफेअर असोसिएशन गेल्या ७ वर्षापासून दक्षिण नागपुरात रस्त्यावर लागलेल्या वृक्षांना पाणी देण्याचे काम करीत आहे. असोसिएशनचे सदस्य सकाळी ७ वाजता आॅटोमध्ये पाणी भरून रस्त्यावरील वृक्षांना देतात. उन्हाळाभर नियमित त्यांचे हे कार्य सुरू होते. त्यांच्या या कार्यामुळे अनेक वृक्ष जगले. दयासागरच्या या कार्यात अजय पांडे, अवनिकांत वर्मा, सॅम्युअल मसीह, सिराज शेख, मनोज गावंडे, यांचेही सहकार्य लाभले. संस्था पर्यावरणाच्या संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविते. मित्र, नातेवाईकांच्या जन्मदिनाला, आप्तेष्टांच्या स्मृतिदिनाला एक वृक्ष लावण्याचे आवाहन करते. असोसिएशनतर्फे शहरातील वंजारीनगर टी. बी. वार्ड, अजनी, इंदिरा कॉलनी, बनर्जी ले-आउट, भगवाननगर, रामेश्वरी, हावरापेठ, चंद्रनगर, महात्मा फुले उद्यान सुयोगनगर, नरेंद्रनगर, पार्वतीनगर यासह हिंगणा परिसरात वृक्ष लागवडीपासून वृक्षाचे संवधन केले आहे.

 २५ वर्षापूर्वी धंतोलीतून येत असताना कचºयाच्या ढिगाºयात आंब्याचे छोटेसे झाड उमलले होते. तेथून ते झाड उचलून मी चंद्रमणीनगरातील डगलस होस्टेल अनाथाश्रमात लावले. आज त्या वृक्षांची फळे परिसरातील लोक खात आहे. तेव्हापासूनच वृक्षांप्रती प्रेम निर्माण झाले. ते आजही सुरूच आहे. याच भावनेतून आम्ही दरवर्षी उन्हाळ्यात रस्त्याच्या काठावरील वृक्षांना पाणी देतो, वृक्षाच्या सभोवतालचा परिसर साफ करून, वृक्षाच्या बुंध्याला आळा करतो. वृक्ष जगावे हाच त्या मागचा प्रयत्न असतो.

मनीष चांदेकर, पदाधिकारी, दयासागर वेलफेअर असोसिएशन
 

Web Title: In Nagpur, 'Dayasagar' did tree conservation in summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.