नागपुरातील पोलीस उपायुक्त निर्मलादेवी ‘सीबीआय’मध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 10:15 PM2020-06-29T22:15:35+5:302020-06-29T22:17:07+5:30

परिमंडळ-४ च्या पोलीस उपायुक्त निर्मलादेवी यांची सीबीआयमध्ये नियुक्ती झाली आहे. सोमवारी त्यांना येथून कार्यमुक्त करण्यात आले. आलटून पालटून पाच वर्षात दोनवेळा एकाच पदावर (पोलीस उपायुक्त म्हणून) नागपूर शहरात काम करणाऱ्या त्या अलीकडच्या काळातील पहिल्याच अधिकारी आहेत.

Nagpur Deputy Commissioner of Police Nirmala Devi in CBI | नागपुरातील पोलीस उपायुक्त निर्मलादेवी ‘सीबीआय’मध्ये

नागपुरातील पोलीस उपायुक्त निर्मलादेवी ‘सीबीआय’मध्ये

googlenewsNext
ठळक मुद्देकार्यमुक्त : आयुक्तांनी दिला निरोप

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : परिमंडळ-४ च्या पोलीस उपायुक्त निर्मलादेवी यांची सीबीआयमध्ये नियुक्ती झाली आहे. सोमवारी त्यांना येथून कार्यमुक्त करण्यात आले. आलटून पालटून पाच वर्षात दोनवेळा एकाच पदावर (पोलीस उपायुक्त म्हणून) नागपूर शहरात काम करणाऱ्या त्या अलीकडच्या काळातील पहिल्याच अधिकारी आहेत.
२०१५ मध्ये त्या नागपुरात पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत होत्या. त्यानंतर त्यांची येथून वर्धा पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली. तेथून त्या मुंबईला बदलून गेल्या आणि परत दोन वर्षांपूर्वी नागपुरात आल्या. येथे त्यांना प्रशासन आणि विशेष शाखेचा पदभार देण्यात आला, तर
वर्षभरापासून त्या परिमंडळ-४ च्या पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत होत्या. तीन महिन्यांपूर्वी त्यांची प्रतिनियुक्तीवर सीबीआयमध्ये बदली झाली. आज सोमवारी त्यांना पदमुक्त करण्यात आले.
सीबीआयमध्ये नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी निर्मलादेवी यांना आज आयुक्तालयात छोटेखानी कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या. बुके देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर उपस्थित होते.

मुंबई किंवा चेन्नईला नियुक्ती
सीबीआयच्या मुंबई किंवा नागपूर शाखेचा कार्यभार त्यांना दिला जाऊ शकतो किंवा चेन्नईतही त्यांची नियुक्ती केली जाऊ शकते.

Web Title: Nagpur Deputy Commissioner of Police Nirmala Devi in CBI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.