नागपुरात लॉजिस्टिक पार्कचा विकास रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 11:30 PM2018-12-14T23:30:22+5:302018-12-14T23:32:30+5:30

भौगोलिक स्थितीनुसार नागपुरात मोठा लॉजिस्टिक पार्क बनविण्याची संकल्पना तयार करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली खापरीमध्ये हा पार्क बनविण्याचा निर्णय घेण्यात आला. पण सात महिन्यानंतरही लॉजिस्टिक पार्कसाठी जागा निश्चित होऊ शकली नाही.

Nagpur developed a development of logistic park | नागपुरात लॉजिस्टिक पार्कचा विकास रखडला

नागपुरात लॉजिस्टिक पार्कचा विकास रखडला

googlenewsNext
ठळक मुद्दे जागा निश्चित नाही : सल्लागारांची नियुक्ती व सर्वे सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भौगोलिक स्थितीनुसार नागपुरात मोठा लॉजिस्टिक पार्क बनविण्याची संकल्पना तयार करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली खापरीमध्ये हा पार्क बनविण्याचा निर्णय घेण्यात आला. पण सात महिन्यानंतरही लॉजिस्टिक पार्कसाठी जागा निश्चित होऊ शकली नाही.
‘एनएएचआय’कडे जबाबदारी
नितीन गडकरी यांच्या घोषणेनुसार खापरीजवळ जवळपास ३०० एकरमध्ये मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क (एमएमएलपी) बनविण्यात येणार आहे. मध्य भारतातील सर्वात मोठ्या पार्कच्या विकासाची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे (एनएएचआय) देण्यात आली आहे. याकरिता सर्व्हेक्षणाचे काम सुरू आहे. प्रकल्पासाठी नियुक्त कंपनी वायलेंट सोल्युशन वाहतुकीचा अभ्यास करीत आहे. अहवालानंतरच यावर पुढे पाऊल टाकण्यात येणार आहे.
हा पार्क जवळपास ३०० एकरमध्ये बनविण्याची योजना आहे. सध्या मिहानजवळील जागा शोधण्यात येत आहे. कॉन्कोरच्या आयसीडीलगतच पार्क बनविण्याचा प्रयत्न आहे. कारण कॉन्कोरचा आयसीडी ४५ एकरमध्ये असून माल वाहतुकीसाठी महत्त्वाची भूमिका पार पाडीत आहे. त्यालगत नवीन पार्कच्या विकासामुळे जास्त अडथळे येणार नाही. त्यानंतरही जमीन निश्चित करण्यात आलेली नाही. प्राप्त माहितीनुसार खापरी आणि कॉन्कोरलगत बांधकाम केल्यामुळे रस्ते, रेल्वे आणि हवाई जोडणीचा लाभ मिळेल. पार्कसाठी तिन्ही माध्यमे उपयुक्त ठरणार आहे.
रेल्वेच्या लाईनचा विस्तार
खापरी येथे सर्व सुविधा आहे. ही जागा निश्चित झाल्यास रेल्वेला एक अतिरिक्त रेल्वेलाईन टाकावी लागेल. याशिवाय रेल्वेलाईनसाठी कॉन्कोरने रेल्वेकडे रक्कम जमा केली आहे. या लाईनच्या विस्तारामुळे दोन्ही प्रकल्पाला फायदा मिळेल आणि नागपूर खऱ्या अर्थात लॉजिस्टिक पार्क बनू शकेल.
वाहतुकीचा अभ्यास
प्राप्त माहितीनुसार, सध्या वाहतूक सर्व्हेक्षणाचे काम सुरू आहे. सध्या आणि भविष्यातील वाहतुकीच्या स्थितीवर दिल्लीची कंपनी माहिती गोळा करीत आहे. गरज कुठल्या वस्तूंची आहे आणि माल कुठे जातो, याचीही चाचपणी घेण्यात येत आहे. सर्व्हेक्षणानंतर लॉजिस्टिक पार्कमध्ये सुविधांचा विकास करण्यात येणार आहे. जीएसटीनंतर नागपूरच्या विकासाच्या शक्यता अधिक प्रबळ झाल्या आहेत. खापरी येथे मोठ्या कंपन्या वेअरहाऊस तयार करीत आहेत. अनेक मोठे ब्रॅण्ड आल्या असून काही कंपन्या विकासाच्या संधी शोधत आहेत.

Web Title: Nagpur developed a development of logistic park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर