Nagpur | मुसळधार पावसामुळे धाम, पोथरा, आसोलामेंढा, दिना प्रकल्प हाउसफुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2022 03:00 PM2022-07-28T15:00:02+5:302022-07-28T15:58:34+5:30

नागपूर विभागातील मोठी धरणे हाऊसफुल्ल

Nagpur | Dham, Pothra, Asolamendha, Dina projects house full due to heavy rains | Nagpur | मुसळधार पावसामुळे धाम, पोथरा, आसोलामेंढा, दिना प्रकल्प हाउसफुल्ल

Nagpur | मुसळधार पावसामुळे धाम, पोथरा, आसोलामेंढा, दिना प्रकल्प हाउसफुल्ल

Next

नागपूर : मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागपूर विभागातील बहुतांश धरणे हाउसफुल्ल झाली आहेत. परिणामी धरणाचे दरवाजे उघडून पाणी सोडले जात आहे.

नागपूर विभागात एकूण १८ मोठी धरणे आहेत. यापैकी वर्धा जिल्ह्यातील धाम, पोथरा, चंद्रपूरमधील आसोलामेंढा व गडचिरोली जिल्ह्यातील दिना प्रकल्प १०० टक्के भरली आहेत, तर नागपूर जिल्ह्यातील कामठी खैरी हे धरण ९६ टक्के तसेच तोतलाडोह ८६ टक्के व रामटेक खिंडसी हे ८२ टक्के भरले. भंडारा जिल्ह्यातील बावनथडी प्रकल्प ८७ टक्के भरला आहे. विभागातील एकूण १८ मोठ्या प्रकल्पांची एकूण क्षमता ३५५२.६६ दलघमी इतकी आहे. यात आजच्या तारखेला एकूण २२८४.१५ दलघमी (६४.२९ टक्के) इतके भरले आहे.

२७ जुलै रोजीचा विचार केला तर गेल्या पाच वर्षात यंदा मोठ्या धरणातील आजच्या तारखेचा जलसाठा हा सर्वाधिक असल्याचे दिसून येते.

- गेल्या पाच वर्षातील सर्वाधिक साठा

२७ जुलै २०२२ - २२८४.१५ दलघमी

२७ जुलै २०२१ -१६९९.३६ दलघमी

२७ जुलै २०२०- २०२०२.४० दलघमी

२७ जुलै २०१९ - २९०.५५ दलघमी

२७ जुलै २०१८ - १२११.८५ दलघमी

२७ जुलै २०१७ - ६६२.६१ टक्के दलघमी

- विभागात सरासरी ११.३ मिमी पाऊस

विभागात गेल्या चोवीस तासात सरासरी ११.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. विभागात बुधवारी कोणत्याही तालुक्यात अतिवृष्टी झाली नाही. परंतु नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. विभागात चोवीस तासांत जिल्हानिहाय नागपूर १२.९, गडचिरोली १२.१, गोंदिया १२.१, भंडारा ११.८, चंद्रपूर १०.७ आणि वर्धा ७.७ मिलीमीटर पाऊस झाला आहे. विभागात १ जून ते २७ जुलैपर्यंत सरासरी ७५०.२ मि. मी. पाऊस पडला.

Web Title: Nagpur | Dham, Pothra, Asolamendha, Dina projects house full due to heavy rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.