नागपूर जिल्ह्यात कोरोना अकराशे पार, ११८१ नवीन पॉझिटिव्ह आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 10:12 AM2021-02-25T10:12:51+5:302021-02-25T10:14:46+5:30

Nagpur News बुधवारी एकाच दिवशी ११८१ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तर १० जणांचा मृत्यू झाला. २९ सप्टेंबरनंतर ही संख्या सर्वाधिक आहे.

In Nagpur district, 1181 new positive corona were found | नागपूर जिल्ह्यात कोरोना अकराशे पार, ११८१ नवीन पॉझिटिव्ह आढळले

नागपूर जिल्ह्यात कोरोना अकराशे पार, ११८१ नवीन पॉझिटिव्ह आढळले

Next
ठळक मुद्दे२९ सप्टेंबरनंतर एकाच दिवशी आढळले सर्वाधिक रुग्ण१० जणांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढली आहे. बुधवारी एकाच दिवशी ११८१ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तर १० जणांचा मृत्यू झाला. २९ सप्टेंबरनंतर ही संख्या सर्वाधिक आहे.  आढळलेल्या रुग्णांची संख्या पाहता ही दुसरी लाट तर नाही ना? अशी शंकाही व्यक्त केली जात आहे. प्रशासनातर्फे अनेक प्रतिबंध लावण्यात आले आहेत तरीही लोकांचा निष्काळजीपणा कायम आहे.

२९ सप्टेंबरला नागपुरात १२१५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते तर ३४ जणांचा मृत्यू झाला होता. त्यादरम्यान १३,४४३ इतके सक्रिय रुग्ण होते. १ ऑक्टोबरला एका दिवशी १०३१ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते तर ३६ जणांचा मृत्यू झाला होता. त्या तुलनेत विचार केला तर मृत्यूंची संख्या कमी आहे. परंतु नागरिकांनी कोविड नियमांचे सक्तीने पालन न केल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्यास जास्त वेळ लागणार नाही.

नागपूर जिल्ह्यात बुधवारी आढळलेल्या एकूण पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये शहरातील ९५५, ग्रामीणमधील २२४ आणि २ जण जिल्ह्याबाहेरचे आहेत. मृतांमध्ये शहरातील ७, ग्रामीणमधील १ आणि २ जण जिल्ह्याबाहेरचे आहेत. आतापर्यंत एकूण १,४५,७१५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर ४,३०१ जणांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये शहरातील १,१६,३७५ आणि ग्रामीणमधील २८,४०८ जण आहेत तर जिल्ह्याबाहेरचे ९३२ जण आहेत. मृतांमध्ये शहरातील २,७८३, ग्रामीणमधील ७६८ आणि जिल्ह्याबाहेरचे ७५० आहेत.

रिकव्हरी रेट ९२.१२ वर

नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने बरे होणाऱ्यांचे प्रमाण घसरले आहे. एक वेळ रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांच्या जवळपास पोहोचला होता. तो आता खाली घसरून ९२.१२ टक्क्यांवर आला आहे. बुधवारी ४५५ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत एकूण १,३४,२३० रुग्ण बरे होऊन आपल्या घरी परतले आहेत.

सक्रिय रुग्णांची संख्या झाली ७,१८४

नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच सक्रिय रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. बुधवारी सक्रिय रुग्णांची संख्या ७,१८४ इतकी झाली. यात शहरातील ५,८३२ व ग्रामीणमधील १,३५२ आहे.

१०,५८४ नमुन्यांची तपासणी

जिल्ह्यात बुधवारी एकूण १०,५८४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. सलग दुसऱ्या दिवशी १० हजारांपेक्षा अधिक नमुने तपासण्यात आले. आतापर्यंत ११ लाख ९७ हजार ७८९ नमुन्यांची तपासणी करण्यात आलेली आहे. बुधवारी तपासण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये शहरातील ६,४७४ आणि ग्रामीणमधील ४,११० आहेत.

कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर अधिक भर देण्यासाठी प्रशासनातर्फे आरटीपीसीआरसोबतच अँटीजेन टेस्ट वाढविण्यात आल्या आहेत. आज ३१६२ अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या, त्यात ५६ पॉझिटिव्ह आढळले तर खासगी प्रयोगशाळेत २,७०४ नमुने तपासण्यात आले. त्यात सर्वाधिक ६०८ पॉझिटिव्ह आलेत. मेयोमध्ये ११९८ पैकी १४६, मेडिकलमध्ये १०८८ पैकी १३९ पॉझिटिव्ह आलेत. एम्समध्ये ६८३ नमुन्यांपैकी ७४ पॉझिटिव्ह आले. नीरीच्या प्रयोगशाळेत ६१ व नागपूर विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत ९७ जण पॉझिटिव्ह आले.

 

 

Web Title: In Nagpur district, 1181 new positive corona were found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.