नागपूर जिल्ह्यात खरिपाच्या ८९ टक्के पेरण्या आटोपल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 11:06 PM2019-08-02T23:06:36+5:302019-08-02T23:08:09+5:30
यावर्षी पावसाने जुलै महिन्याच्या शेवटी शेवटी पदार्पण केल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. जुलै महिन्याच्या सुरुवातीला एक दोन दिवस झालेल्या पावसाने काही शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस पेरला होता. पण भाताच्या रोवण्यासाठी अपेक्षित पाऊस झाला नसल्यामुळे शेतकरी प्रतीक्षेत होते. जुलैच्या अखेर अखेर सुरू झालेल्या पावसामुळे खरिपाच्या पेरण्या ८९ टक्के आटोपल्या आहे. सोबतच धानाच्या रोवणीलाही गती आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यावर्षी पावसाने जुलै महिन्याच्या शेवटी शेवटी पदार्पण केल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. जुलै महिन्याच्या सुरुवातीला एक दोन दिवस झालेल्या पावसाने काही शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस पेरला होता. पण भाताच्या रोवण्यासाठी अपेक्षित पाऊस झाला नसल्यामुळे शेतकरी प्रतीक्षेत होते. जुलैच्या अखेर अखेर सुरू झालेल्या पावसामुळे खरिपाच्या पेरण्या ८९ टक्के आटोपल्या आहे. सोबतच धानाच्या रोवणीलाही गती आली आहे.
खरिपामध्ये जिल्ह्यात सर्वाधिक कापूस, सोयाबीन, तूर व धान (भात) हे पीक मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते. धान वगळता इतर सर्व पिकांच्या जवळपास पेरण्या मागच्या आठ दिवसांपूर्वीच आटोपल्या होत्या. परंतु पाऊस नसल्याने धानाची रोवणी रखडली होती. जिल्ह्यातील मौदा, कामठी, उमरेड, कुही, रामटेक, भिवापूर या तालुक्यांमध्ये धानाचे क्षेत्र आहे. जिल्ह्यात धानाचे नियोजित क्षेत्र ९४२०० हेक्टर आहे. पाऊस नसल्याने धानाची रोवणी थांबली होती. २७ जुलैपासून पावसाला सुरुवात झाल्यानंतर शेतकºयांनी धान रोवणी सुरू केली. आतापर्यंत जिल्ह्यात धानाची २० हजार हेक्टरवर रोवणी झाली आहे.
जिल्ह्यात खरिपाचे ४ लाख ७९ हजार २१० हेक्टरवर नियोजन केले आहे. यात कापसाचे नियोजित क्षेत्र २ लाख १९ हजार हेक्टर असून, कापसाची लागवड २ लाख ३१ हजार ७११ हेक्टरवर करण्यात आली आहे. तर सोयाबीनचे १ लाख हेक्टर व भाताचे ९४ हजार २०० हेक्टर क्षेत्र आहे. आजवर जिल्ह्यात एकूण क्षेत्राच्या ४ लाख २० हजार हेक्टरवर म्हणजेच सुमारे ८९ टक्के पेरणी आटोपल्या आहे. यात तुरीची ६२ हजार हेक्टर, भूईमुंग ११६० हेक्टर, सोयाबीन ८२ हजार ९५६, ऊस १२६३ हेक्टर व इतर तेलजन्य बियांची ८४ हजार २६६ हेक्टरवर तसेच ज्वारीची ३०००, मुगाची ६६५ हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे.