नागपूर जिल्हा मागून दुसरा, पाचवा क्रमांक पटकावला

By आनंद डेकाटे | Published: May 21, 2024 04:30 PM2024-05-21T16:30:06+5:302024-05-21T16:31:21+5:30

Nagpur : मुलींनीच मारली बाजी

Nagpur district came second behind, fifth place | नागपूर जिल्हा मागून दुसरा, पाचवा क्रमांक पटकावला

Nagpur district came second behind, fifth place

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
राज्य माध्यमिक बोर्डाच्या बारावीच्या निकाल मंगळवारी जाहीर झाला. नागपूर विभागाचा विचार केला तर विभाग हा राज्यात आठव्या क्रमांकावर राहिला. मागून दुसरा राहिला. त्याचप्रमाणे नागपूर विभागाचा विचार केला तर नागपूर जिल्हा हा विभागात मागून दुसरा राहिला. सहा जिल्ह्याच्या विभागात नागपूर जिल्ह्याने ८९.९३ टक्के गुण घेऊन पाचवा क्रमांक पटकावला.

नागपूर विभागात गोंदिया जिल्ह्याने बाजी मारली. ९५.२४ टक्के गुण घेऊन गोंदिया जिल्हा हा विभागात अव्वल ठरला. त्यानंतर भंडारा जिल्ह्याने ९४.६८ टक्के गुण घेऊन दुसरा, गडचिरोली तिसरा, चंद्रपूर जिल्ह्याने चौथा क्रमांक पटकावला. वर्धा जिल्हा हा विभागात सर्वात शेवटी राहिला.

नागपूर जिल्ह्यातून बारावीच्या परीक्षेला एकूण (रेग्युलर आणि खासगी मिळून) ६६,४३६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६६,०३६ विद्यार्थी परिक्षेला बसले. यापैकी ५८,६४६ विद्यार्थी पास झाले. यातही मुलींनीच बाजी मारली. ९१.४९ टक्के मुली तर ८६.२३ टक्के मुले उत्तीर्ण झाले.

विभागातील जिल्हानिहाय टक्केवारी
गोंदिया - ९५.२४ टक्के
भंडारा - ९४.६८ टक्के
गडचिरोली - ९४.४२ टक्के
चंद्रपूर - ९३.८९ टक्के
नागपूर - ८९.९३ टक्के
वर्धा - ८९.४० टक्के
एकूण - ९२.१२ टक्के

Web Title: Nagpur district came second behind, fifth place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.