नागपूर जिल्ह्यात वाघाने केली गोऱ्ह्याची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 12:22 PM2019-11-27T12:22:53+5:302019-11-27T12:23:19+5:30

नागपूर तालुक्यातील खडका शिवारातून सोंडापार शिवारात गेलेल्या वाघाने मंगळवारच्या पहाटेला अरुण आष्टणकर यांच्या शेतातील गोऱ्ह्यावर हल्ला करून शिकार केली.

In Nagpur district, cow hunted by a tiger | नागपूर जिल्ह्यात वाघाने केली गोऱ्ह्याची शिकार

नागपूर जिल्ह्यात वाघाने केली गोऱ्ह्याची शिकार

Next
ठळक मुद्देसोंडापार शिवारातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तालुक्यातील खडका शिवारातून सोंडापार शिवारात गेलेल्या वाघाने मंगळवारच्या पहाटेला अरुण आष्टणकर यांच्या शेतातील गोऱ्ह्यावर हल्ला करून शिकार केली. बुटीबोरी वनविभागाचे क्षेत्रिय वनाधिकारी एस.डी.त्रिपाठी यांनी वाघाने गोऱ्ह्याची शिकार केल्याचे स्पष्ट केले. मात्र तेथे उपस्थित असलेल्या माकडाच्या कळपाने कोलाहल केला. त्यामुळे वाघाने शिकार केलेल्या गोऱ्ह्याला तिथेच सोडून पळ काढला. बुटीबोरी वनपरिक्षेत्र अधिकारी एल.व्ही.ठोकळ यांच्या नेतृत्वातील पथकाने तिथे सीसीटीव्ही लावून आपली निगराणी वाढवली आहे. वाघ पुन्हा या परिसरात शिकार करण्यासाठी परत येऊ शकतो यासाठी यंत्रणा सज्ज ठेवली आहे. परिसरात वाघाचा वावर वाढल्यामुळे स्थानिक शेतकरी आणि नागरिकात भीतीचे वातावरण आहे.

Web Title: In Nagpur district, cow hunted by a tiger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ