नागपूर जिल्ह्यात १८३ बालके कुपोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 01:33 AM2018-06-22T01:33:28+5:302018-06-22T01:33:40+5:30

कुपोषणाचा प्रश्न ग्रामीण भागात अजूनही गंभीर आहे. नुकतीच जिल्ह्यातील अंगणवाडी स्तरावर सहा महिने ते सहा वर्ष वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील १८३ बालके ही तीव्र कुपोषित असल्याचे आढळून आले आहे. या बालकांना कुपोषणाच्या निकषातून बाहेर काढण्यासाठी अंगणवाडीत नियमित आहाराशिवाय अतिरिक्त आहार व औषधोपचार देण्यात येत आहे.

Nagpur district has 183 malnourished children | नागपूर जिल्ह्यात १८३ बालके कुपोषित

नागपूर जिल्ह्यात १८३ बालके कुपोषित

Next
ठळक मुद्देबालकांच्या आरोग्य तपासणीतून उघड : अंगणवाडीतून अतिरिक्त आहार-औषधोपचाराची सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुपोषणाचा प्रश्न ग्रामीण भागात अजूनही गंभीर आहे. नुकतीच जिल्ह्यातील अंगणवाडी स्तरावर सहा महिने ते सहा वर्ष वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील १८३ बालके ही तीव्र कुपोषित असल्याचे आढळून आले आहे. या बालकांना कुपोषणाच्या निकषातून बाहेर काढण्यासाठी अंगणवाडीत नियमित आहाराशिवाय अतिरिक्त आहार व औषधोपचार देण्यात येत आहे.
सामान्य, मध्यम व तीव्र असे कुपोषणाचे निकष असतात. साधारणत: आदिवासी क्षेत्रात कुपोषित बालकांचे जास्त प्रमाण आढळून येते असा समज आहे. मात्र, बिगर आदिवासी क्षेत्रातील लहान बालकांच्या कुपोषणावर प्रभावीपणे मात करण्यासाठीही शासन ग्राम बालविकास केंद्र ही योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात कार्यरत २४२३ अंगणवाड्यातील ग्राम बालविकास केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यातील सहा महिने ते सहा वर्षे वयोगटातील बालकांचे आरोग्य विभागातील अधिकारी व अंगणवाडी सेविका, परिचारिका यांच्या माध्यमातून जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ)च्या निकषानुसार आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. आजवर जिल्ह्यातील ३० हजारावर नमूद वयोगटातील बालकांची तपासणी करण्यात आली. यात जिल्ह्यात तब्बल १८३ बालके ही तीव्र कुपोषित असल्याचे आढळून आले. डब्ल्यूएचओच्या निकषानुसार या बालकांचे उंचीनुसार वजन मोजण्यात आले. मात्र, ते निकषापेक्षा कमी आढळून आले. तीव्र कुपोषित बालकांना घरच्या नियमित आहाराशिवाय अंगणवाडीच्या माध्यमातून ७ वेळा नियमित व अतिरिक्त असा आहार पुरविण्यात येत आहे. यात सकाळी ८ व सायंकाळी ८ यावेळेत हो आहार पुरविण्यात येत आहे. यात केळी, अंडी तसेच विशेष औषधोपचार देण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे महिला व बालविकास अधिकारी भागवत तांबे यांनी दिली.

तालुकानिहाय कुपोषित बालकांची संख्या
तालुकाबालकांची संख्या
रामटेक १०
काटोल ११
कळमेश्वर ११
सावनेर २१
भिवापूर ०९
पारशिवनी १०
नरखेड १५
कुही २०
उमरेड १३
हिंगणा २२
नागपूर १८
मौदा १४
कामठी ०९

Web Title: Nagpur district has 183 malnourished children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.