नागपूर जिल्ह्यात भरधाव ट्रकने दाेघांना चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 11:39 PM2021-04-05T23:39:49+5:302021-04-05T23:41:45+5:30

Accident, death भरधाव ट्रकने समाेर असलेल्या माेटारसायकलला जाेरात धडक देत दुचाकीवरील दाेघांना चिरडले. त्यात दाेघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला.

In Nagpur district, two person was crushed by a truck | नागपूर जिल्ह्यात भरधाव ट्रकने दाेघांना चिरडले

नागपूर जिल्ह्यात भरधाव ट्रकने दाेघांना चिरडले

Next
ठळक मुद्देदुचाकीला दिली मागून धडक : खुरजगाव शिवारातील घटना

लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर/केळवद : भरधाव ट्रकने समाेर असलेल्या माेटारसायकलला जाेरात धडक देत दुचाकीवरील दाेघांना चिरडले. त्यात दाेघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. दाेघेही शेती करायचे. ही घटना केळवद (सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील सावनेर-केळवद मार्गावरील खुरजगाव शिवारातील एका धाब्यासमाेर साेमवारी (दि. ५) रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली.

वामन गोविंदराव आगरकर (हावरे) (४८) व नंदकिशाेर अशुराज जाेगी (२७) दाेघेही रा. हत्तीसर्रा, ता. सावनेर अशी मृतांची नावे आहेत. वामन आणि नंदकिशाेर माेटरसायकलने (क्र. एमएच-३२ एफ-२५८२) सावनेरहून केळवदच्या दिशेने हत्तीसर्रा येथे जात हाेते. ते खुरजगाव फाटा परिसरातील धाब्याजवळ पाेहाेचताच मागून वेगात येणाऱ्या ट्रकने (एमपी-०९/जीएच-०३६०) त्यांच्या माेटारसायकलला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने दाेघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला.
माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठले. दाेन्ही मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी सावनेर येथील शासकीय रुग्णालयात आणले. दाेघांकडेही थाेडीफार शेती असून, ते शेतीवर उदरनिर्वाह करायचे. ते खरेदी करण्यासाठी सावनेर शहरात आले हाेते. अपघात हाेताच चालकाने ट्रक साेडून पळ काढला. त्यामुळे पाेलिसांनी ट्रक जप्त केला असून, क्लिनर इद्रिस अहमद इरफान अहमद (रा.बिटाडिया, इंदाेर, मध्य प्रदेश) यास अटक केली असून, ट्रकचालक गुफरान खान (रा.राजापूर, मध्य प्रदेश) यास लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती ठाणेदार दिलीप ठाकूर यांनी दिली. याप्रकरणी केळवद पाेलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक अर्जुन राठाेड करीत आहेत.

Web Title: In Nagpur district, two person was crushed by a truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.