नागपूर जिल्ह्यात ग्रा.पं.साठी मतदानाला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 03:26 PM2018-09-26T15:26:11+5:302018-09-26T15:28:01+5:30

नागपूर जिल्ह्यातील ३७४ ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आणि सदस्यपदासाठी घेण्यात येत असलेल्या मतदानाला बुधवारी शांततेत सुरुवात झाली. जिल्ह्यात सर्वच तालुक्यात दुपारी २ पर्यंत सरासरी ४५ टक्क्याहून अधिक मतदानाची नोंद झाली होती.

In the Nagpur district, the voting speed for the village panchayat is going on | नागपूर जिल्ह्यात ग्रा.पं.साठी मतदानाला वेग

नागपूर जिल्ह्यात ग्रा.पं.साठी मतदानाला वेग

googlenewsNext
ठळक मुद्दे३७४ ग्रा.पं.मध्ये मतदान७३०३ उमेदवार रिंगणातदुपारी २ पर्यंत ४५ टक्के मतदान

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील ३७४ ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आणि सदस्यपदासाठी घेण्यात येत असलेल्या मतदानाला बुधवारी शांततेत सुरुवात झाली. जिल्ह्यात सर्वच तालुक्यात दुपारी २ पर्यंत सरासरी ४५ टक्क्याहून अधिक मतदानाची नोंद झाली होती.
राज्य निवडणूक आयोगाने नागपूर जिल्ह्यातील ३८१ ग्राम पंचायत आणि रामटेक तालुक्यातील भिलेवाडा येथील सरपंचपदाचा निवडणूक कार्यक्रम २३ आॅगस्ट रोजी जाहीर केला होता. निवडणुकीचे सर्व टप्पे पार पडल्यानंतर जिल्ह्यात ६ ग्रा.पं.मध्ये सरपंच आणि सदस्यपदाची निवडणूक बिनविरोध पार पडली. यासोबत दोन ग्रा.पं.मध्ये सरपंच पदाचे उमेदवार बिनविरोध नामित करण्यात आले. त्यामुळे बुधवारी ३७४ ग्रा.पं.मध्ये सरपंच आणि सदस्य पदासाठी मतदानाला सकाळी ७.३० वाजता सुरुवात झाली.
जिल्ह्यात सरपंच आणि ग्रा.प.च्या सदस्य पदाच्या एकूण २९४० जागांसाठी मतदान घेण्यात येत आहे. जिल्ह्यातील ३७४ सरपंचपदासाठी १३०९ उमेदवार रिंगणात आहेत. यासोबतच ३७४ ग्रा.पं.च्या विविध संवर्गातील सदस्य पदासाठी ५९९४ उमेदवार रिंगणात आहेत. यासाठी ५ लाख ९९ हजार ६६६ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील.
नरखेड तालुक्यात ३० ग्रा.पं.मध्ये दुपारी २ वाजेपर्यंत ३५ टक्के मतदान झाले होते. यानंतर कामठी तालुक्यातील ११ ग्रा.पं.मध्ये दुपारी २ पर्यंत ५३ टक्के मतदान झाले. मौदा तालुक्यात ३१ ग्रा.पं.मध्ये २५ टक्के मतदान झाले. भिवापूर तालुक्यातील २७ ग्रा.पं.मध्ये दुपारी १२ पर्यंत २८.५८ टक्के मतदान झाले. काटोल तालुक्यात दुपारी १२ पर्यंत २६ टक्के मतदान झाले. कळमेश्वर तालुक्यात २१ ग्रा.पं.साठी दुपारी २ पर्यंत ५३ टक्के मतदान झाले होते.
रामटेक तालुक्यातील नवरगाव केंद्रावर केंद्र प्रमुखाला उमेदवाराने मारहाण केल्याने येथे काही काळासाठी तणाव निर्माण झाला होता.
उमरेड तालुक्यात दुपारी २ पर्यंत ३० टक्के मतदान झाले. नरखेड तालुक्यात दुपारी २ पर्यंत ५० टक्याहून अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
सावनेर तालुक्यातील २७ ग्रा.पं.मध्ये दुपारी १.३० वाजेपर्यंत ४७.३५ टक्के मतदान झाले होते. रामटेक तालुक्यात दुपारी १.३० वाजेपर्यंत ४७.६२ टक्के मतदान झाले होते.

 

Web Title: In the Nagpur district, the voting speed for the village panchayat is going on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.