नागपूर विभागात ३ हजार ४३७ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 10:38 AM2018-02-22T10:38:53+5:302018-02-22T10:43:39+5:30

नागपूर विभागातील ६४ ब्लॉकपैकी ५४ ब्लॉक हागणदरीमुक्त जाहीर झाले आहे. तसेच एकूण ३ हजार ६४३ ग्रामपंचायतीपैकी ३ हजार ४३७ म्हणजेच विभागात ९४ टक्के काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती केंद्रीय पाणीपुरवठा, स्वच्छता विभागाचे सहसचिव अरुण बरोमा यांनी दिली.

In the Nagpur division, 3,371 gram panchayats are free from street toileting | नागपूर विभागात ३ हजार ४३७ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त

नागपूर विभागात ३ हजार ४३७ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त

googlenewsNext
ठळक मुद्देकेंद्रीय पाणीपुरवठा, स्वच्छता विभागाचे सहसचिव अरुण बरोमा यांची माहितीस्वच्छ भारत मिशनचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विभागातील ६४ ब्लॉकपैकी ५४ ब्लॉक हागणदरीमुक्त जाहीर झाले आहे. तसेच एकूण ३ हजार ६४३ ग्रामपंचायतीपैकी ३ हजार ४३७ म्हणजेच विभागात ९४ टक्के काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती केंद्रीय पाणीपुरवठा, स्वच्छता विभागाचे सहसचिव अरुण बरोमा यांनी दिली.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात नागपूर विभागातील स्वच्छ भारत मिशनचा आढावा केंद्रीय सहसचिव अरुण बरोमा यांनी घेतला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त अनुप कुमार, पाणीपुरवठा विभागाचे उपसचिव रुचेश जयवंशी, वर्ल्ड बँकेचे प्रतिनिधी राघवन आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी बरोमा म्हणाले, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर व वर्धा येथे शंभर टक्के हागणदारीमुक्त गावे जाहीर झाले असून गडचिरोली जिल्ह्यातील काम प्रगतिपथावर आहे.
विभागात बेसलाईन सर्वेनुसार १३ लाख ७१ हजार ८३२ शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाले आहेत. यामध्ये भंडारा जिल्ह्यात २ लाख ७ हजार ६२६, चंद्रपूर ३ लाख ३ हजार ९५, गडचिरोली १ लाख ६० हजार १२९, गोंदिया २ लाख १७ हजार १२३, नागपूर २ लाख ९१ हजार ५५ तर वर्धा जिल्ह्यात १ लाख ९२ हजार ८०४ शौचालय असलेल्या कुटुंबांची संख्या आहे. ग्रामीण भागात सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनासोबत प्लास्टिकमुक्त गाव ही संकल्पना राबविण्याची आवश्यकता असून यासाठी लोकसहभाग मिळावा म्हणून मुख्य कार्यपालन अधिकारी तसेच ग्रामस्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष मोहीम राबावावी अशी सूचना विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी केली. विभागातील पाच जिल्ह्यामध्ये हागणदारीमुक्तीचे कामाबद्दलही यावेळी त्यांनी माहिती दिली.

Web Title: In the Nagpur division, 3,371 gram panchayats are free from street toileting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.