नागपूर विभागात ९९ टक्के पंचनामे पूर्ण : १, ७६,५७३.८१ हेक्टरवर नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 08:35 PM2019-11-13T20:35:57+5:302019-11-13T20:37:30+5:30

शेतकऱ्यांच्या पीक हातात आले असताना, परतीच्या पावसाने केलेल्या धुमाकुळीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. नागपूर विभागात १,७६,५७३.८१ हेक्टरवर नुकसान झाले असून, नुकसानीच्या पंचनाम्याचे काम ९९ टक्के पूर्ण झाले आहे.

In Nagpur division, 99 percent of the panchanamas were completed: Damage to 1,76,573.81 hectares above | नागपूर विभागात ९९ टक्के पंचनामे पूर्ण : १, ७६,५७३.८१ हेक्टरवर नुकसान

नागपूर विभागात ९९ टक्के पंचनामे पूर्ण : १, ७६,५७३.८१ हेक्टरवर नुकसान

googlenewsNext
ठळक मुद्देशासनाला पाठवायचा आहे १५ नोव्हेंबरपर्यंत नुकसानीचा अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शेतकऱ्यांच्या पीक हातात आले असताना, परतीच्या पावसाने केलेल्या धुमाकुळीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. नागपूर विभागात १,७६,५७३.८१ हेक्टरवर नुकसान झाले असून, नुकसानीच्या पंचनाम्याचे काम ९९ टक्के पूर्ण झाले आहे. शासनाला नुकसानीचा अहवाल १५ नोव्हेंबरपर्यंत पाठविण्यासाठी प्रशासन सज्ज आहे.
परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. कापूस, सोयाबीन, धान, ज्वारी यासह फळ पिकांनाही मोठा फटका बसला. कापसाची बोंड गळून पडली. कापलेली सोयाबीन काळवंडली. संत्रा आणि मोसंबी गळून पडली. यावर्षी उशिरा आलेल्या मान्सूनमुळे बराच काळ पेरण्या खोळंबल्या होत्या. त्याचा परिणाम उत्पादनावर झाला होता. आता पीक कापणीला आले असताना परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची थट्टाच केली. काळजीवाहू सरकार शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहचले. लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून आंदोलन झाली. शासनाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाकडून पंचनाम्याचे काम वेगाने सुरू झाले. नागपूर विभागात १,७६,५७३.८१ हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले आहे. आतापर्यंत नागपूर जिल्ह्यासह इतर पाचही जिल्ह्याचे पंचनामे १०० टक्के आटोपले आहे. बुधवारी प्रशासनाकडे आलेल्या अहवालानुसार १,७५,३७७.२१ हेक्टर क्षेत्रफळाचे पंचनामे पूर्ण झाले आहे. पंचनामे पूर्ण झालेल्या शेतकºयांची संख्या ३,२०,४१९ इतकी आहे.

Web Title: In Nagpur division, 99 percent of the panchanamas were completed: Damage to 1,76,573.81 hectares above

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.