दहावीत नागपूर विभाग तळाला; निकाल ६७.२७ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 02:04 PM2019-06-08T14:04:44+5:302019-06-08T14:05:13+5:30

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. मागील वर्षीच्या तुलनेत नागपूर विभागाचा निकाल यंदा चक्क १८.७० टक्क्यांनी घटला.

Nagpur division down in SSC result; The result was 67.27 percent | दहावीत नागपूर विभाग तळाला; निकाल ६७.२७ टक्के

दहावीत नागपूर विभाग तळाला; निकाल ६७.२७ टक्के

googlenewsNext
ठळक मुद्दे१८.७० टक्क्यांनी घटला निकाल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. मागील वर्षीच्या तुलनेत नागपूर विभागाचा निकाल यंदा चक्क १८.७० टक्क्यांनी घटला. संपूर्ण विभागाच्या निकालाची टक्केवारी ही अवघी ६७.२७ टक्के इतकीच आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदादेखील विभाग राज्यात तळाशीच आहे.
विभागात नेहमीप्रमाणे मुलींनीच बाजी मारली असून उत्तीर्णांमध्येदेखील विद्यार्थिनींचेच प्रमाण जास्त आहे. विभागातून ७९ हजार ५३ विद्यार्थिनींनी परीक्षा दिली व त्यातील ५८ हजार ९८१ उत्तीर्ण झाल्या. त्यांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ७४.६१ टक्के इतकी आहे. तर विद्यार्थ्यांचे प्रमाण ६०.२७ टक्के इतके आहे. शुक्रवारी दुपारी १ वाजता नागपूर विभागाचे निकाल जाहीर करण्यात आले. नागपूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष देशपांडे रविकांत देशपांडे यांनी निकालाची घोषणा केली. नागपूर विभागात एकूण १ लाख ६२ हजार ५ पैकी१ लाख ८ हजार ९७७ परीक्षार्थ्यांनी यश संपादित केले.

विभागात गोंदिया जिल्हा ‘टॉप’
नागपूर विभागात यंदा नागपूर जिल्ह्यातील उत्तीर्णांचे प्रमाण सर्वात जास्त आहे. नागपूर जिल्ह्यातून ६१ हजार ३४१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली व त्यापैकी ४४ हजार ९ म्हणजेच ७१.७४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गोंदिया जिल्ह्यातून २१ हजार ५७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १४ हजार ४१६ म्हणजेच ६८.४६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर विभागात उत्तीर्णांची सर्वात कमी टक्केवारी गडचिरोली जिल्ह्याची आहे. तेथे १४ हजार ९६९ पैकी केवळ ८ हजार १८० म्हणजे ५४.६५ टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण झाले.

जिल्हानिहाय उत्तीर्णांची टक्केवारी
जिल्हा                    निकाल टक्केवारी
भंडारा                     ६५.९९ %
चंद्रपूर                     ६५.५८ %
नागपूर                    ७१.७४ %
वर्धा                         ६५.०५ %
गडचिरोली               ५४.६५ %
गोंदिया                    ६८.४६ %

Web Title: Nagpur division down in SSC result; The result was 67.27 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.