Nagpur Division Teachers Constituency : मतदानास सुरुवात; सकाळी १० पर्यंत सरासरी १३.५७ टक्के मतदान

By आनंद डेकाटे | Published: January 30, 2023 12:24 PM2023-01-30T12:24:29+5:302023-01-30T12:26:12+5:30

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक

Nagpur Division Teachers Constituency Election Voting Begins; 13.57 percent average voter turnout till 10 am | Nagpur Division Teachers Constituency : मतदानास सुरुवात; सकाळी १० पर्यंत सरासरी १३.५७ टक्के मतदान

Nagpur Division Teachers Constituency : मतदानास सुरुवात; सकाळी १० पर्यंत सरासरी १३.५७ टक्के मतदान

googlenewsNext

नागपूरविधानपरिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी आज (दि. ३० जाने.) गडचिरोली जिल्ह्यात सकाळी ७.०० वा. पासून तर अन्य पाच जिल्ह्यांमध्ये ८.०० वा. पासून मतदानास सुरुवात  झाली आहे. मतदान शांततेत सुरु असून सकाळी १०.०० वाजेपर्यंत सर्व जिल्ह्यांमध्ये (गडचिरोली जिल्ह्यात सकाळी ९.०० वाजेपर्यंत) सरासरी १३.५७ टक्के मतदान झाल्याची माहिती, निवडणूक अधिकारी तथा विभागीय आयुक्त कार्यालयाने दिली आहे.

या निवडणुकीत एकूण २२ उमेदवार निवडणूक लढत आहेत. गडचिरोली जिल्ह्यात १८ मतदान केंद्रांवर मतदान सुरु असून सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत १२.८६ टक्के मतदान झाले आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये ४३ मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. या जिल्ह्यात सकाळी १०.०० वाजेपर्यंत ११.९४ टक्के मतदान झाले आहे. भंडारा जिल्ह्यात १२ मतदान केंद्रांवर मतदान होत असून १३.१२ टक्के मतदान झाले आहे. गोंदिया जिल्ह्यातील १० मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. या जिल्ह्यात ११.८३ टक्के मतदान झाले आहे. वर्धा जिल्ह्यात १४ मतदान केंद्रावर मतदान होत असून १५.४९ टक्के मतदान झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील २७ मतदान केंद्रांवर मतदान होत आहे या जिल्ह्यात १७.२९ टक्के मतदान झाले आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार गडचिरोली जिल्ह्यात मतदानाची वेळ सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. तर नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होत आहे.

Web Title: Nagpur Division Teachers Constituency Election Voting Begins; 13.57 percent average voter turnout till 10 am

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.