जूनपासून सुरू होणार नागपूर-दोहा विमानसेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2022 08:30 AM2022-03-27T08:30:00+5:302022-03-27T08:30:02+5:30

Nagpur News दोन वर्षांपूर्वी बंद झालेले कतार एअरवेजचे नागपूर-दोहा उड्डाण आता जूनपासून सुरू होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून संचालित होणारी ही एकमात्र ‘फाईव्ह स्टार’ एअरलाईन्स आहे.

Nagpur-Doha flight will start from June | जूनपासून सुरू होणार नागपूर-दोहा विमानसेवा

जूनपासून सुरू होणार नागपूर-दोहा विमानसेवा

googlenewsNext
ठळक मुद्दे आठवड्यातून चार दिवस कतारचे उड्डाण

वसीम कुरैशी

नागपूर : दोन वर्षांपूर्वी बंद झालेले कतार एअरवेजचे नागपूर-दोहा उड्डाण आता जूनपासून सुरू होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून संचालित होणारी ही एकमात्र ‘फाईव्ह स्टार’ एअरलाईन्स आहे.

कतार एअरवेजचे मुख्य कार्यकारी अधिकारी अकबर अल बकर २००७ ला नागपुरात आले होते. तत्कालिन नागरी उड्डयण मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी नागपुरातून उड्डाण सुरू केले होते. काही काळानंतर हे उड्डाण बंद झाले होते. त्यानंतर २०१५ मध्ये पुन्हा सुरू झाले आणि २०२० मध्ये लॉकडाऊनच्या काळात पुन्हा बंद झाले.

पूर्वी कतार एअरवेज मे २०२२ मध्ये उड्डाण सुरू करणार होते. आता जूनपासून उड्डाण सुरू करण्याची तयारी आहे. कतार नागपुरातून दोहाकरिता एअरबस-३२० विमानाने उड्डाण करणार आहे. एकूण १४४ सीटांच्या या विमानात १२ बिझनेस क्लास आणि १३२ इकॉनॉमिक क्लास सीट आहेत. विमानात मनोरंजन आणि भोजनाची सुविधा आहे. २८४० किमीच्या प्रवासासाठी ४.३० तासांचा वेळ लागतो.

Web Title: Nagpur-Doha flight will start from June

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :airplaneविमान