नागपुरात आणखी आठ परिसर सील, एकाची व्याप्ती केली कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 09:11 PM2020-07-07T21:11:29+5:302020-07-07T21:12:49+5:30

शहरात कोरोना संसर्ग वाढत असल्याने प्रतिबंधित क्षेत्रात दररोज वाढ होत आहे. मंगळवारी यात पुन्हा ८ क्षेत्रांची भर पडली. तर एका परिसराची व्याप्ती कमी करण्यात आली. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी याबाबतचे आदेश जारी केले.

In Nagpur, eight more areas were sealed, one less | नागपुरात आणखी आठ परिसर सील, एकाची व्याप्ती केली कमी

नागपुरात आणखी आठ परिसर सील, एकाची व्याप्ती केली कमी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात कोरोना संसर्ग वाढत असल्याने प्रतिबंधित क्षेत्रात दररोज वाढ होत आहे. मंगळवारी यात पुन्हा ८ क्षेत्रांची भर पडली. तर एका परिसराची व्याप्ती कमी करण्यात आली. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी याबाबतचे आदेश जारी केले.
नव्या प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये नेहरूनगर झोन क्रमांक ५ अंतर्गत प्रभाग क्रमांक ३० येथील आशीर्वादनगर, गांधी झोन महाल क्रमांक ६ अंतर्गत प्रभाग क्रमांक १९ येथील लोधीपुरा, हजहाऊस, हनुमाननगर झोन क्रमांक ३ अंतर्गत प्रभाग क्रमांक ३१ येथील रेशीमबाग, याच झोन अंतर्गत प्रभाग क्रमांक ३४ येथील महात्मा फुलेनगर, भोले बाबानगर तसेच प्रभाग क्रमांक २९ येथील नीलकमलनगर, नरसाळा, सतरंजीपुरा झोन क्रमांक ७ अंतर्गत प्रभाग क्रमांक २१ येथील प्रेमनगर झेंडा चौक याच झोन अंतर्गत प्रभाग क्रमांक ५ येथील मेहंदीबाग रोड, बिनाकी या परिसरांचा समावेश आहे. तर नेहरूनगर झोन क्रमांक ५ अंतर्गत प्रभाग क्रमांक २८ येथील न्यू गाडगे बाबानगर या परिसराची व्याप्ती कमी करण्यात आली आहे.

असे आहेत प्रतिबंधित परिसर
आशीर्वादनगर - पूर्वेस नंदकिशोर ठोंबरे यांचे घर, पश्चिमेस मुश्ताक शेख यांचे घर, उत्तरेस प्रमोद गोजे यांचे घर, दक्षिणेस रमेशलाल शाह यांचे घर. लोधीपुरा, हजहाऊस दक्षिण-पूर्वेस हज हाऊस, उत्तर-पूर्वेस शेख युनस अब्दुल रज्जाक, उत्तर-पश्चिमेस जी.एन.एस.फ्यईनर एजन्सी, दक्षिण-पश्चिमेस विकास आॅटो एजन्सी. रेशीमबाग उत्तरेस अंबादास मेहता यांचे घर ते पुष्पांजली अपार्टमेंट, पूर्वेस पुष्पांजली अपार्टमेंट ते वराडे यांचे घर, दक्षिणेस वराडे ते संघ कार्यालय गेट, पश्चिमेस संघ कार्यालय गेट ते अंबादास मेहता यांचे घर. महात्मा फुलेनगर उत्तरेस कोरडे ते अंतुरकर यांचे घर, पूर्वेस अंतुरकर ते हिवसे यांचे घर, दक्षिणेस हिवसे ते इलेक्ट्रिकल पोल नंबर जी/९, पश्चिमेस इलेक्ट्रिकल पोल नंबर जी/९ ते कोरडे यांचे घर. भोले बाबानगर उत्तरेस वैष्णोधाम अपार्टमेंट ते प्लॉट क्रमांक ३६५, पूर्वेस प्लॉट क्रमांक ३५४ ते ३६२ ते रेणुका माँ किराणा, दक्षिणेस रेणुका माँ किराणा ते बाजारे (प्लॉट क्रमांक ३५४), तर पश्चिमेस बाजारे प्लॉट क्रमांक ३५४ ते वैष्णोधाम अपार्टमेंट प्लॉट क्रमांक ३७२ ते प्लॉट क्रमांक ३६६. नीलकमलनगर, नरसाळा दक्षिण-पूर्वेस विलास पाटील प्लॉट क्रमांक ८१, दक्षिण-पश्चिमेस सुरेश वानखेडे प्लॉट क्रमांक ६८, उत्तर-पश्चिमेस प्रमिला मांडवकर प्लॉट क्रमांक ९६, उत्तर-पूर्वेस नरेश रामटेके प्लॉट क्रमांक ७६. प्रेमनगर झेंडा चौक उत्तर-पूर्वेस अजबरावजी वांदे यांचे घर, दक्षिण-पूर्वेस कीर्ती भाजपीय यांचे घर, दक्षिण-पश्चिमेस एम. मोतेवार यांचे घर, उत्तर-पश्चिमेस राहुल उमरेडकर यांचे घर. मेहंदीबाग रोड, बिनाकी, उत्तर-पूर्वेस रोकडे यांचे घर, पूर्वेस बंटी धुर्वे यांचे घर, पूर्वेस वाकोडीकर यांचे घर, दक्षिण-पूर्वेस सरोदे फ्रेम वर्क, पश्चिमेस हिरणवार व शिवमंदिर, उत्तरेस ताज पान पॅलेस.

Web Title: In Nagpur, eight more areas were sealed, one less

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.