नागपूर दक्षिण-पश्चिम निकाल: पोस्टल बॅलेट मतात देवेंद्र फडणवीस आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 08:36 AM2019-10-24T08:36:08+5:302019-10-24T08:51:40+5:30

Nagpur Election Results 2019; Devendra Fadanvis Vs Ashish Deshmukh देवेंद्र फडणवीस यांनी मतमोजणीच्या मैदानात आपले खाते उघडले

Nagpur Election Results 2019; Devendra Fadanvis Vs Ashish Deshmukh Nagpur Southwestern results: Devendra Fadnavis leads in the postal ballet vote | नागपूर दक्षिण-पश्चिम निकाल: पोस्टल बॅलेट मतात देवेंद्र फडणवीस आघाडीवर

नागपूर दक्षिण-पश्चिम निकाल: पोस्टल बॅलेट मतात देवेंद्र फडणवीस आघाडीवर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: १३ व्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या मतदानाच्या मतमोजणीला गुरुवारी सकाळी ८ वाजता प्रारंभ झाला. कडेकोट बंदोबस्तात ठेवलेल्या ईव्हीएम मशीन्स मतमोजणी कक्षात नेऊन मतमोजणीस सुरुवात करण्यात आली. यात सर्वप्रथम पोस्टल बॅलेट मोजणीत नागपूरच्या दक्षिण पश्चिम मतदारसंघातील उमेदवार देवेंद्र फडणवीस हे पोस्टल बॅलेट मतात आघाडीवर आहेत. एकूण ७३२ पोस्टल मते आलेली आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून रिंगणात आहेत. त्यांना काँग्रेसकडून माजी आ. आशिष देशमुख यांनी आव्हान दिले आहे. मुख्यमंत्री राज्यभर प्रचारात व्यस्त असल्याने भाजपच्या स्थानिक टीमने धुरा सांभाळली आहे. येथे ‘ऑल इज वेल’ असल्याचा त्यांचा दावा आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याची जबाबदारी असली तरी त्यांनी दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघाकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. मागील पाच वर्षांत येथील विकासकामांचा नियमित आढावा घेत मतदारसंघात पक्ष संघटन मजबूतीवरदेखील भर दिला. शहरासोबतच ‘होमपीच’लादेखील त्यांनी ‘स्मार्ट’ करत भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आणखी जोमाने काम करण्यासाठी प्रोत्साहनच दिले.

Web Title: Nagpur Election Results 2019; Devendra Fadanvis Vs Ashish Deshmukh Nagpur Southwestern results: Devendra Fadnavis leads in the postal ballet vote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.