Nagpur: लग्नाचे आमीष दाखवून केले शोषण, गुन्हा दाखल
By दयानंद पाईकराव | Published: March 23, 2024 09:54 PM2024-03-23T21:54:50+5:302024-03-23T21:56:23+5:30
Nagpur Crime News: लग्नाचे आमीष दाखवून ३१ वर्षीय महिलेचे शोषण केल्या प्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी आरोपी प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
-दयानंद पाईकराव
नागपूर - लग्नाचे आमीष दाखवून ३१ वर्षीय महिलेचे शोषण केल्या प्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी आरोपी प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीयुष बंडुजी ढावले (३३, रा. सुठाणा, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर) असे आरोपीचे नाव आहे. पिडीत ३१ वर्षीय महिला आरोपीच्या दुकानात काम करते. १२ एप्रिल २०२२ ते ३० नोव्हेंबर २०२३ दरम्यान आरोपीने या महिलेस लग्नाचे आमीष दाखवून तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित केले. दीड वर्ष महिलेसोबत त्याने शरीरसंबंध केल्यावर महिलेने लग्नासाठी हट्ट धरला. परंतु आरोपीने पिडीत महिलेस हात बुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी पिडीत महिलेने दिलेल्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३७६ (२), (एन), ४१७, ३२३ नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.
गुन्हा दाखल केलेला अधिकारीच अनभिज्ञ
प्रतापनगर पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण डोखले यांनी हा बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. परंतु त्यांना याबाबत विचारना केली असता आपणास या प्रकरणाबद्दल काहीही माहिती नसल्याचे सांगून उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे प्रतापनगर पोलिस ठाण्यात अधिकारी कुठलीही माहिती न घेता गुन्हा दाखल करतात की काय ? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.