मोटारसायकलवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, नागपुरात रेस्टॉरंट मालकाची हत्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 12:29 IST2025-04-15T12:27:09+5:302025-04-15T12:29:06+5:30

नागपुरात एका रेस्टॉरंट मालकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने शहरात एकच खळबळ माजली आहे.

Nagpur Firing News Sharpshooters fire six rounds at Restaurant owner in Ambazari | मोटारसायकलवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, नागपुरात रेस्टॉरंट मालकाची हत्या!

मोटारसायकलवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, नागपुरात रेस्टॉरंट मालकाची हत्या!

नागपुरात पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली. शहरातील धरमपेठ परिसरात एका रेस्टॉरंट मालकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच अंबाझरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कारवाईला सुरुवात केली. हत्येचे कारण अस्पष्ट असून जुन्या वैमन्यस्यातून ही हत्या करण्यात आली असावी, असा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

अविनाश भुसारी (वय, २८) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून तो अंबाझरी पोलीस हद्दीतील गोकुळपेठ बाजार परिसरातील शोशा लाउंज एंड रेस्टॉरंटचा मालक आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश आपल्या हा आपल्या मित्रांसोबत बसलेला असताना मध्यरात्रीच्या सुमारास चार जण मोटारसायकवरून त्याच्याजवळ आले आणि त्याच्यावर गोळीबार केला. गोळीबाराच्या घटनेत गंभीर जखमी झालेल्या अविनाशला ताबडतोब जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच अंबाझरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. हत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

जुन्या वैमन्यस्यातून अविनाशची हत्या करण्यात आली असावी, असा संशय अंबाझरी पोलिसांनी व्यक्त केला आहे. आरोपींची ओळख पटली नसून त्यांचा शोध घेण्यासाठी दोन पथके तयार करण्यात आल्याची माहिती अंबाझरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेकानंद राऊत यांनी दिली. नागपुरात पुन्हा एकदा झालेल्या या गोळीबाराच्या घटनेने नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. 

Web Title: Nagpur Firing News Sharpshooters fire six rounds at Restaurant owner in Ambazari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.