नागपुरात पाच हजारांवर गप्पी मासे पाण्यात सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 12:59 AM2018-05-17T00:59:56+5:302018-05-17T01:00:10+5:30

राष्ट्रीय डेंग्यू दिनाचे औचित्य साधून नागपूर महापालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागातर्फे दहाही झोनमध्ये गप्पी मासे वितरण प्रभातफेरी काढण्यात आली. या दरम्यान शहरभरात निरनिराळ्या ठिकाणच्या पाण्यामध्ये सुमारे पाच हजारांवर गप्पी मासे सोडण्यात आले.

In Nagpur, five thousand guppy fish left in the water | नागपुरात पाच हजारांवर गप्पी मासे पाण्यात सोडले

नागपुरात पाच हजारांवर गप्पी मासे पाण्यात सोडले

googlenewsNext
ठळक मुद्देडेंग्यू दिवस : हिवताप व हत्तीरोग विभागातर्फे दहाही झोनमध्ये प्रभातफेरी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय डेंग्यू दिनाचे औचित्य साधून नागपूर महापालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागातर्फे दहाही झोनमध्ये गप्पी मासे वितरण प्रभातफेरी काढण्यात आली. या दरम्यान शहरभरात निरनिराळ्या ठिकाणच्या पाण्यामध्ये सुमारे पाच हजारांवर गप्पी मासे सोडण्यात आले.
मंगळवारी झोनमध्ये जरीपटका येथील दयानंद पार्क येथे प्रभातफेरी काढण्यात आली. यावेळती स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी नागरिकांना डेंग्यू आजाराची माहिती दिली. डासांच्या अळ्या होणार नाही यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन केले. कुकरेजा नगर, कस्तुरबानगर, कुशीनगर, एमआयजी कॉलनी आदी भागातून प्रभातफेरी काढण्यात आली.
नेहरुनगर झोनमध्ये विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे यांच्या उपस्थितीत नेहरूनगर झोनमध्ये नवीन नंदनवन पाण्याच्या टाकीजवळून, प्रभातफेरी काढण्यात आली. तसेच अन्य झोनमध्येही प्रभातफेरी काढण्यात आली. यात धंतोली झोन सभापती विशाखा बांते, नेहरूनगर झोन सभापती रिता मुळे, धरमपेठ झोन सभापती प्रमोद कौरती, नगरसेविका रेखा साकोरे, वनिता दांडेकर, रूपा राय, शीतल कामडे, जयश्री वाडीभस्मे, दिव्या धुरडे, झिशान मुमताज अन्सारी, आशा ऊईके, सय्यदा बेगम, कांता रारोकर, भावना संतोष लोणारे, मंगला योगेश लांजेवार, नगरसेवक सुनील हिरणवार, सतीश होले, संजय चावरे, हिवताप व हत्तीरोग अधिकारी जयश्री थोटे, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, राजू वराटे, विजय काळे सहभागी झाले होते.
प्रभातफेरीच्या प्रारंभी उपस्थित नागरिकांनी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कीटकजन्य आजारावर नियंत्रण मिळविण्याबाबतची शपथ घेली. नागरिकांना आरोग्य शिक्षण व कीटकजन्य आजाराबाबत माहिती देण्यात आली. प्रभातफेरीदरम्यान पत्रके वाटून, स्टीकर, पोस्टर लावून जनजागृती करण्यात आली. त्यानंतर प्रत्येक झोनमध्ये गप्पी मासे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
३१०० घरांना भेटी
प्रभातफेरीदरम्यान सर्व झोनमधून एकूण ३१०० घरांना भेटी देण्यात आल्या. या भेटीत कुलरमध्ये ३८३०, निरुपयोगी विहिरींमध्ये २७, टाक्यांमध्ये ८१९, मातीच्या भांड्यात १५५, कारंज्यांमध्ये सात, मोठ्या नाल्यांमध्ये सात, लहान नाल्यांमध्ये नऊ, तळघरांमध्ये पाच, रिकाम्या भूखंडांवर तीन, बांधकामाच्या स्थळी असलेल्या लिफ्टच्या खड्डयांमध्ये तीन, वेगवेगळ्या प्रकारच्या खड्डयांमध्ये १२ आणि अन्य ठिकाणी २०७ असे एकंदर पाच हजारांवर गप्पी मासे सोडण्यात आले.

Web Title: In Nagpur, five thousand guppy fish left in the water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.