Nagpur Rain: नागपुरात १४० लोकांना सुरक्षित बाहेर काढले; शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2023 11:36 AM2023-09-23T11:36:42+5:302023-09-23T11:43:29+5:30

गरज नसेल त्यांनी घराबाहेर पडू नका असं आवाहन स्थानिक प्रशासनाकडून लोकांना केले जात आहे.

Nagpur Flood: 140 people evacuated safely in Nagpur; Holidays announced for schools, colleges | Nagpur Rain: नागपुरात १४० लोकांना सुरक्षित बाहेर काढले; शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

Nagpur Rain: नागपुरात १४० लोकांना सुरक्षित बाहेर काढले; शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

googlenewsNext

नागपूर – मुसळधार पावसामुळे नागपूर शहरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सततच्या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले आहे. पुरात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी एसडीआरएफच्या २ तुकड्या ७ गटात विभागल्या आहेत. नागपूर पूरपरिस्थितीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने लक्ष ठेवून प्रशासनाला योग्य त्या सूचना, आदेश देत आहेत.

नागपुरात एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीमने आतापर्यंत १४० लोकांना सुरक्षित बाहेर काढले आहे. त्याचसोबत मुक बधीर विद्यालयातील ४० विद्यार्थ्यांना सुखरुप बाहेर काढले आहे. नागपूर शहराच्या विविध भागात सध्या २ एनडीआरएफ टीम सक्रीय आहेत. त्याचसोबत महापालिकेचे अग्निशमन दलाचे पथकही बचाव कार्यात उतरले आहेत. अंबाझरी परिसरात लष्कराच्या २ तुकड्या पोहचल्या आहेत.

पूरामुळे खबरदारी म्हणून नागपुरात शाळा-महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. गरज नसेल त्यांनी घराबाहेर पडू नका असं आवाहन स्थानिक प्रशासनाकडून लोकांना केले जात आहे. त्याचसोबत वृद्ध नागरिकांना सर्व ती मदत तातडीने द्या असे निर्देश फडणवीसांनी दिले आहेत. दरम्यान, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि घाबरून जाऊ नका असं आवाहनही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी लोकांना केले आहे.

'या' जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट!

२६ सप्टेंबरपर्यंत राज्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नागपुरात आज पहाटेपासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरु आहे. शहरातील अनेक भागात पाणी साचले आहे. तसेच, अनेक ठिकाणी विजांमुळे सेटटॉप बॉक्स, टीव्हीच्या आयसी उडाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. दरम्यान, आज राज्यातील रायगड, भंडारा, गोंदिया आणि नागपूर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

नाशिक, जळगाव, जालना, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांत आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्याच्या उर्वरित इतर जिल्ह्यांमध्ये मात्र आज ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय, पुढील दोन दिवसांत राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Web Title: Nagpur Flood: 140 people evacuated safely in Nagpur; Holidays announced for schools, colleges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.