नागपुरात पत्नीला जबरदस्तीने फिनाईल पाजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 01:08 AM2018-11-27T01:08:23+5:302018-11-27T01:09:58+5:30

एटीएम कार्ड देण्यास नकार दिल्यामुळे झालेल्या वादात आरोपी पतीने पत्नीला जबरदस्तीने फिनाईल पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यानंतर सासू आणि मेव्हण्याला मारहाण करून त्यांच्या अ‍ॅक्टिव्हाची तोडफोड केली. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

In Nagpur, forcibly the wife pawned phynile | नागपुरात पत्नीला जबरदस्तीने फिनाईल पाजले

नागपुरात पत्नीला जबरदस्तीने फिनाईल पाजले

googlenewsNext
ठळक मुद्देसमजविण्यास गेलेल्या सासू आणि मेव्हण्यालाही मारहाण : जरीटपक्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एटीएम कार्ड देण्यास नकार दिल्यामुळे झालेल्या वादात आरोपी पतीने पत्नीला जबरदस्तीने फिनाईल पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यानंतर सासू आणि मेव्हण्याला मारहाण करून त्यांच्या अ‍ॅक्टिव्हाची तोडफोड केली. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
किशोर विनायक खंडाळे, विनायक खंडाळे, माला खंडाळे, धनराज खंडाळे आणि अनिल गावंडे, अशी या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत. आरोपी किशोर आणि पूजा या पती-पत्नीत शुक्रवारी दुपारी १ च्या सुमारास एमटीएम कार्डच्या वापरावरून जोरदार वाद झाला. किशोरने पत्नीला मारहाण करून जबरदस्तीने फिनाईल पाजले. तिने आरडाओरड करून घराबाहेर पळ काढला. त्यानंतर पूजाच्या भावाने तिला जनता हॉस्पिटलमध्ये भरती केले. औषधोपचारानंतर तिचा भाऊ आणि आई पूजाला घेऊन तिच्या घरी गेले. यावेळी पूजाच्या भावाने आणि आईने आरोपी किशोर तसेच त्याच्या नातेवाईकांची समजूत घालून चांगले वागण्याचा सल्ला दिला. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. आरोपी किशोर, त्याचे वडील, भाऊ आणि अन्य नातेवाईकांनी पूजासोबतच तिच्या भावाला आणि आईला मारहाण केली. एवढेच नव्हे तर पूजाच्या भावाच्या अ‍ॅक्टिव्हाचीही तोडफोड केली. शेजारी धावल्यानंतर आरोपी माघारले. पूजाने या घटनेची तक्रार जरीपटका ठाण्यात नोंदवली. पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून आरोपी किशोर तसेच त्याच्या चार नातेवाईकांवर गुन्हा दाखल केला.

Web Title: In Nagpur, forcibly the wife pawned phynile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.