नागपुरचा गँगस्टर सुमित ठाकूर अजूनही फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 12:43 AM2018-06-28T00:43:55+5:302018-06-28T00:47:19+5:30
गँगस्टर पिन्नू पांडेवर गोळीबार केल्याप्रकरणी गँगस्टर सुमित ठाकूर अजूनही गिट्टीखदान पोलिसांच्या हाती लागलेला नाही. परंतु गोळीबर करणारा सुमितचा साथीदार उर्जेर ऊर्फ उज्जू खालीद खान याला अटक करण्यात आली. उज्जूने पिन्नूवर गोळी चालवण्याची कबुली दिली आहे. यादरम्यान पिन्नू पांडे टोळीद्वारे गोळीबाराचा बदला घेण्याच्या शक्यतेने पेन्शननगरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गँगस्टर पिन्नू पांडेवर गोळीबार केल्याप्रकरणी गँगस्टर सुमित ठाकूर अजूनही गिट्टीखदान पोलिसांच्या हाती लागलेला नाही. परंतु गोळीबर करणारा सुमितचा साथीदार उर्जेर ऊर्फ उज्जू खालीद खान याला अटक करण्यात आली. उज्जूने पिन्नूवर गोळी चालवण्याची कबुली दिली आहे. यादरम्यान पिन्नू पांडे टोळीद्वारे गोळीबाराचा बदला घेण्याच्या शक्यतेने पेन्शननगरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.
मंगळवारी सायंकाळी गिट्टीखदान पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या जखमी पेन्शननगर चौकात सुमित ठाकूर गँगच्या सदस्यंनी २७ वर्षीय गुन्हेगार कुलदीप ऊर्फ पिन्नू पांडेवर गोळीबार केला होता. चालत्या बाईकवरून गोळी चालवल्याने निशाणा चुकला आणि पिन्नूच्या गुडघ्याला गोळी लागली. त्याने जवळच्याच एका दुकानात लपून आपला जीव वाचवला होता. या गोळीबारात मोहनलाल धुरिया (५४) रा. मिसाळ ले-आऊट आणि एक अल्पवयीनही जखमी झाला होता. सीसीटीव्हीच्या आधारावर पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहे. प्राथमिक चौकशीत पोलिसांना सुमित ठाकूर गँगवर संशय आला होता. पिन्नूने सुमित ठाकूर, नौशाद, इरफान गोली, पिंकू तिवारी, लाला पांडे आणि मोन्या शिंदेने गोळीबार केल्याचे सांगितले होते. पोलीस तपसात सुमितचा साथीदार उर्जेर ऊर्फ उज्जूने गोळी चालवल्याचे आढळून आले. पोलीस तेव्हापासून उज्जूचा शोध घेत होते. बुधवरी तो गिट्टीखदान पोलिसांच्या हाती लागला. सूत्राुसार त्याने गोळीबार केल्याचे कबूल केले आहे. तो आपल्या साथीदारासह बाईकवर बसून आला होता. त्यानेच मागे बसून पिन्नूवर गोळ्या घातल्या. दिवसभर विचारपूस केल्यानंतर सायंकाळी त्याला अटक करण्यात आली.
पेन्शननगर पोलीस मुख्यालयाजवळ आहे. या परिसरात राहणारे बहुतांश नागरिक पोलीस कर्मचारी किंवा अधिकारी आहेत. यानंतरही या परिसरात अवैध धंदे सर्रास सुरू आहेत. जुगार अड्डा, सट्टा, मटका, अवैध दारू विक्रीचे अनेक अड्डे आहेत.
पिन्नू पांडे हा सराईत गुन्हेगार आहे. तो दीड महिन्यांपूर्वीच जामिनावर सुटून आला. बाहेर आल्यापासून तो दिवसभर पेन्शननगर परिसरातच राहतो. पेन्शननगर चौकातच त्याचा अड्डा होता. या चौकात नेहमी वर्दळ असते. यानंतरही आरोपींनी चालत्या बाईकवरून पिन्नूवर हल्ला करण्याचे धाडस केले. सूत्रानुसार गोळीबरीमुळे पिन्नू गँगचे सदस्य अतिशय संतापले आहेत. सुमित त्यांच्यासाठी धोका वाटू लगला आहे. त्याचा बदला घेण्याची ते तयारी करीत असल्याचे सांगितले जाते.
जखमींची नावेही माहीत नाही
या प्रकरणात इतर दोघे जखमी झाले परंतु त्यांची नावेही गिटटीखदान पोलिसांकडे नाही. त्यामुळे पोलीस या प्रकरणाला किती गांभीर्याने हाताळत आहे, हे दिसून येते. गिट्टीखदान पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडे पिन्नू शिवाय दुसऱ्या जखमींची नावे नव्हती. जखमी मोहनलाल धुरिया याचे नाव लगेच माहीत झाले होते. त्यांनी पोलीस सूचना केंद्रालाही याबाबत माहिती दिली नाही.