Nagpur: आजपासून गरीबरथ एक्सप्रेस नवीन कोचसह धावणार
By नरेश डोंगरे | Published: June 23, 2024 07:09 PM2024-06-23T19:09:16+5:302024-06-23T19:09:46+5:30
Nagpur News: नागपूर-पुणे-नागपूर या मार्गावर प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक वृत्त आहे. मध्य रेल्वेने गरिबरथ एक्सप्रेसच्या डब्यात वाढ केली आहे. त्यानुसार, या गाडीत गर्दीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
नागपूर - नागपूर-पुणे-नागपूर या मार्गावर प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक वृत्त आहे. मध्य रेल्वेने गरिबरथ एक्सप्रेसच्या डब्यात वाढ केली आहे. त्यानुसार, या गाडीत गर्दीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
नागपूर पुणे आणि पुणे नागपूर या मार्गावर वर्षातील १२ ही महिने प्रवाशांची गर्दी असते. ट्रॅव्हल्सचे भाडे परवडणारे नसल्याने रेल्वेकडेच अनेक प्रवासी धाव घेतात. त्यामुळे या मार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाड्या, खास करून नागपूर पुणे नागपूर गरिबरथ एक्सप्रेसमध्ये मोठी गर्दी असते. नाईलाजाने प्रवाशांना नाकतोंड दाबून गर्दीत प्रवास करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या प्रशासनाने या दोन्ही गाड्यांमध्ये दोन अतिरिक्त कोच वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, १२११४ नागपूर - पुणे गरीबरथ नागपूर येथून २५ जून पासून तर १२११३ पुणे -नागपूर गरीबरथ पुणे येथून २६ जून पासून दोन नवीन कोचसह प्रवाशांच्या सेवेत धावणार आहे. नवीन कोच संरचनेनुसार गरीब रथ एक्सप्रेस मध्ये १८ एसी थ्री टायर इकॉनोमी, २ जनरेटर कोच असतील.