नागपूरला मिळाले सहा नवे पोलीस उपायुक्त;  एकूण १३ नवे पोलीस अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2022 09:35 PM2022-11-07T21:35:29+5:302022-11-07T21:36:49+5:30

Nagpur News गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृहशहर असलेल्या नागपूरला अखेर सहा नवे उपायुक्त मिळाले आहेत.

Nagpur gets six new Deputy Commissioners of Police; A total of 13 new police officers | नागपूरला मिळाले सहा नवे पोलीस उपायुक्त;  एकूण १३ नवे पोलीस अधिकारी

नागपूरला मिळाले सहा नवे पोलीस उपायुक्त;  एकूण १३ नवे पोलीस अधिकारी

googlenewsNext
ठळक मुद्देउपायुक्त राजमाने, पखाले यांची बदली 

नागपूर : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृहशहर असलेल्या नागपूरला अखेर सहा नवे उपायुक्त मिळाले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांच्या रिक्तपदांमुळे विद्यमान अधिकाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण आला होता व बदल्यांकडे सर्वांचे लक्ष लागले होते. गृहविभागाने जारी केलेल्या आदेशानुसार नागपूरला एकूण १३ नवे पोलीस अधिकारी मिळाले आहेत.

दोन आठवड्यांअगोदर शहरातील उपायुक्तांच्या बदल्या झाल्या होत्या. त्यानंतर, काही दिवसांअगोदर दोन पोलीस उपायुक्त पदोन्नतीने मिळाले. मात्र, तरीही चार जागा रिक्त होत्या. गृहविभागाने जारी केलेल्या निर्देशांनुसार नागपूरला नवीन अधिकारी मिळाले आहेत. मुमक्का सुदर्शन, धोंडोपंत स्वामी, अनुराग जैन, गोरख भामरे, श्रवण दत्त, सुनील लोखंडे या सहा अधिकाऱ्यांची नागपुरात पोलीस उपायुक्तपदी बदली झाली आहे. याशिवाय प्रियंका नारनवरे (समादेशक, रा.रा.पोलीस बल), विश्वास पांढरे (पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण), सुनील कडासने (पोलीस अधीक्षक, लोहमार्ग), विश्व पानसरे (पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग), यशवंत सोळंके (पोलीस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक) हे नवे अधिकारी मिळाले आहेत. सोबतच नागपूर ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक राहुल माकनिकर यांची लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे अधीक्षक तर उपायुक्त संदीप पखाले यांची नागपूर ग्रामीण अपर पोलीस अधीक्षकपदी बदली झाली आहे.

चार अधिकाऱ्यांची जिल्ह्याबाहेर बदली

दरम्यान, नागपूरच्या परिमंडळ-तीनचे उपायुक्त गजानन राजमाने यांची मुंबईतील फोर्स वनच्या अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. तर गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर यांची पुणे लोहमार्ग पोलीस अधीक्षकपदी बदली झाली आहे. सोबतच पोलीस अधीक्षक (नागरी हक्क संरक्षण) प्रशांत खैरे यांची अहमदनगर पोलीस अधीक्षकपदी, रा.रा.पोलीस बलाचे समादेशक पंकज डहाणे यांची नवी मुंबई पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती झाली आहे.

हे आहेत नवीन पोलीस अधिकारी

नाव : जुने पद : नवीन पद

मुमक्का सुदर्शन : अपर पोलीस अधीक्षक, परभणी : पोलीस उपायुक्त, नागपूर

धोंडोपंत स्वामी : पोलीस उपायुक्त, मुंबई परिमंडळ-८ : पोलीस उपायुक्त, नागपूर

अनुराग जैन : अपर पोलीस अधीक्षक, लातूर : पोलीस उपायुक्त, नागपूर

गोरख भामरे : अपर पोलीस अधीक्षक, वाशिम : पोलीस उपायुक्त, नागपूर

श्रवण दत्त : अपर पोलीस अधीक्षक, खामगाव-बुलडाणा : पोलीस उपायुक्त, नागपूर

सुनील लोखंडे : पोलीस उपायुक्त, आर्थिक गुन्हे शाखा, ठाणे : पोलीस उपायुक्त नागपूर

प्रियंका नारनवरे : पोलीस उपायुक्त, परिमंडळ-१, पुणे : समादेशक, रा.रा.पोलीस बल, नागपूर

विश्वास पांढरे : उपायुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई : पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण

सुनील कडासने : पोलीस अधीक्षक, एसीबी, नाशिक : पोलीस अधीक्षक, लोहमार्ग, नागपूर

विश्व पानसरे : पदस्थापनेच्या प्रतीक्षेत : पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, नागपूर

यशवंत सोळंके : अपर पोलीस अधीक्षक, वर्धा : पोलीस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक, नागपूर

राहुल माकनिकर : अपर पोलीस अधीक्षक (ग्रामीण) : पोलीस अधीक्षक, एसीबी

संदीप पखाले : पोलीस उपायुक्त, नागपूर : अपर पोलीस अधीक्षक (ग्रामीण)

Web Title: Nagpur gets six new Deputy Commissioners of Police; A total of 13 new police officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस