नागपूर - गोवा ट्रेन पुन्हा धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 09:53 PM2019-05-16T21:53:26+5:302019-05-16T21:54:48+5:30

दोन वर्षापूर्वी चालविण्यात आलेल्या हॉलिडे स्पेशल नागपूर - मडगाव (गोवा) ट्रेन पुन्हा सुरू होणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव मध्य रेल्वेचे महाप्रबंधक बी.के. शर्मा यांनी मंडळ प्रबंधकांना मुख्यालयाला पाठविण्यास सांगितले आहे. तसेच बंद करण्यात आलेली अजनी-काजीपेठ पॅसेंजर ट्रेनसुद्धा पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन शर्मा यांनी दिले. गुरुवारी मध्य रेल्वे मंडळाच्या प्रबंधक कार्यालयात रेल्वे महाप्रबंधक शर्मा यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Nagpur - Goa train will run again | नागपूर - गोवा ट्रेन पुन्हा धावणार

नागपूर - गोवा ट्रेन पुन्हा धावणार

googlenewsNext
ठळक मुद्देअजनी - काजीपेठ पॅसेंजरही सुरू होईल : मेमू शेडसाठी पाठविण्यात येईल प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दोन वर्षापूर्वी चालविण्यात आलेल्या हॉलिडे स्पेशल नागपूर - मडगाव (गोवा) ट्रेन पुन्हा सुरू होणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव मध्य रेल्वेचे महाप्रबंधक बी.के. शर्मा यांनी मंडळ प्रबंधकांना मुख्यालयाला पाठविण्यास सांगितले आहे. तसेच बंद करण्यात आलेली अजनी-काजीपेठ पॅसेंजर ट्रेनसुद्धा पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन शर्मा यांनी दिले.
गुरुवारी मध्य रेल्वे मंडळाच्या प्रबंधक कार्यालयात रेल्वे महाप्रबंधक शर्मा यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नागपूर- गोवा बंद करण्यात आलेल्या ट्रेन संदर्भात ते म्हणाले की, मंडळ रेल्वे प्रबंधक कार्यालयाकडून ही गाडी आठवड्यातून एकदा चालविण्यासाठीचा प्रस्ताव मुख्यालयाला पाठविण्यात येईल. २०१७ मध्ये हिवाळ्यात ख्रिसमसच्या महिन्यात ही गाडी हॉलिडे स्पेशल म्हणून चालविण्यात आली होती. १६ डब्यांच्या या ट्रेनला प्रवाशांचा भरपूर प्रतिसाद मिळाला होता. मात्र त्यानंतर ही ट्रेन बंद करण्यात आली. अजनी-काजीपेठ पॅसेंजर ट्रेनच्या संदर्भातही असेच काहिसे घडले. परंतु ही ट्रेन काही कालावधीसाठी बंद करण्यात आली आहे. लवकरच सुरू करण्यात येईल. ब्रॉडगेज लाईनवर मेमू ट्रेन चालविण्यासंदर्भात महामेट्रोसोबत झालेल्या करारासंदर्भात त्यांनी सांगितले की, महामेट्रो जेव्हा कोच उपलब्ध करून देईल, तेव्हा सेवा सुरू करण्यात येईल. नागपूर-वर्धा थर्ड लाईनच्या प्रश्नावर महाप्रबंधक म्हणाले की, यासाठी महाराष्ट्र सरकारकडून भूमी अधिग्रहणासाठी पूर्ण सहकार्य मिळत आहे. काम मोठे असल्याने वेळ लागत आहे. पत्रपरिषदेत रेल्वे महाप्रबंधक यांच्यासोबत डीआरएम सोमेश कुमार, एडीआरएम (इन्फ्र ा) मनोज तिवारी, एडीआरएम (परिचालन) एन. के. भंडारी यांच्यासह अन्य शाखा प्रमुख व अधिकारी उपस्थित होते.

एफओबीसाठी डिझाईन निश्चित नाही
मुंबईमध्ये दोन वर्षापूर्वी एलफिस्टन रोड स्टेशनवर एफओबी (फु ट ओव्हर ब्रिज) वर भीषण घटना घडली होती. त्यानंतर मध्य रेल्वेच्या सर्व प्रमुख स्टेशनवर मजबूत व सुविधायुक्त एफओबी तयार करण्याचे निर्देश दिले होते. नागपूर स्टेशनच्या प्लॅटफॉर्म १ ते ८ दरम्यान एक एफओबी प्रस्तावित आहे. यात ६० मीटर स्पॅनचे डिझाईन निश्चित झालेले नाही. विशेष म्हणजे रेल्वेची इंजिनिअरिंग बॅ्रन्च आणि आरडीएसओसारखी संस्था असतानाही विकासाशी जुळलेल्या महत्त्वाच्या कार्याकडे दुर्लक्ष होत आहे.

मेमू ट्रेनसाठी प्रस्ताव
रेल्वे महाप्रबंधक बी.के. शर्मा यांनी मान्य केले की, पॅसेंजर ट्रेन मेमू ट्रेनमध्ये परावर्तित होणे आवश्यक आहे. यासाठी प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. यासाठी मेमू शेडची आवश्यकता आहे. मध्ये रेल्वेमध्ये मेमू शेडसाठी प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात येणार आहे. त्याचबरोबर नागपुरात एलएचबी ला वर्कशॉप बनविण्यात येईल. वाढत्या प्रवाश्यांमुळे ट्रेनमध्ये अतिरिक्त कोच लावण्यात येत असल्याबाबत प्रश्न विचारला असता, शर्मा म्हणाले की, ट्रेनला अतिरिक्त कोच न लावता स्पेशल ट्रेन चालविण्यात येते. अजनी स्टेशनच्या विकासासाठी रेल्वेच्या पुढच्या भूमिकेवर कुठलेही ठोस उत्तर मिळाले नाही. बी.के. शर्मा यांच्याशी झालेल्या चर्चेत नागपुरातील सर्वच महत्त्वपूर्ण बाबींवर प्रस्ताव, आश्वासन व मंजुरी एवढ्यापुरतीच मर्यादित दिसून आली.

Web Title: Nagpur - Goa train will run again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.