खरसोलीमध्ये अनिल देशमुखांना धक्का, अजित पवार गटाच्या नीलिमा नरेश अडसरे विजयी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 11:07 AM2023-11-06T11:07:53+5:302023-11-06T11:14:59+5:30
Nagpur gram panchayat election Result : ३५७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पाच ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणूक
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, सुनील केदार, अनिल देशमुख, नितीन राऊत, आशिष देशमुख या दिगजांच्या नागपूर जिल्ह्यातील 357 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पाच ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी रविवारी मतदान झाले. 1224 मतदान केंद्रावर सरासरी 85 टक्के मतदान झाले असून या निवडणुकीचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. निकाल ऐकण्यासाठी केंद्रावर नागरिकांंची गर्दी पाहायला मिळत आहे.
कामठी तालुक्यातील बाबुळखेडा ग्रामपंचायतपदी भाजप समर्थित गटाचे कदीर इमाम छवारे विजयी झाले असून वारेगाव ग्रामपंचायत सरपंचपदी काँग्रेस समर्थित गटाच्या रत्नाबाई अजाबराव उईके विजयी झाल्या आहेत.
नरखेड तालुक्यात भाजपने खाते उघडले असून, मोगरा ग्राम पंचायतच्या सरपंचपदी भाजपच्या मीनाक्षी उमेश्वर मडके या विजयी झाल्या आहेत.
कुही तालुका ग्रामपंचायत निवडणूक : 1) अडम - शालिनी गुणाकार सेलोकर भाजप, इतर 9 उमेदवार भाजपचे विजयी 2) आकोली - मंदा भीमराव पाटील काँग्रेस सदस्यांमध्ये 7 सदस्य काँग्रेस चे विजयी 3)अंबाडी - योगेश अरुण गोरले काँग्रेस सदस्या मध्ये 7 सदस्य काँग्रेसचे विजयी पाहिल्या राउंड मध्ये विजयी सरपंच
पारशिवणी तालुक्यातील निंबा ग्राम पंचायतीत काँग्रेसच्या लिलाबाई विजय भक्ते विजयी झाल्या आहेत.
कवठा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजप समर्थित गटाचे निलेश श्रीधर डफरे विजयी तर, नेरी ग्रामपंचायत सरपंचपदी भाजप समर्थित गटाचे सुजाता सुरेश पाटील विजयी झाले आहेत.
कुही तालुका ग्रामपंचायत निवडणूक: १) नक्षी गट ग्राम पंचायत
सरपंच - अनिकेत ज्ञानेश्वर वराडे (भाजप)
२) वडध ग्रामपंचायत
सरपंच - गुरूदेव काळे (स्वतंञ पॅनल)
३) चिखली गट ग्रामपंचायत
सरपंच - प्रणाली सतिष गारघाटे (राजू गारघाटे यांचे पॅनल)
भंडारबोडी ग्रामपंचायतमध्ये कांग्रेसच्या सुनिता रमेश मिसार सरपंचपदी विजयी. तर बोरी येथे काँग्रेसच्या प्रेमलता राजेंद्र कंगाली विजयी
खरसोलीमध्ये अनिल देशमुखांना धक्का बसला असून अजित पवार गटाच्या नीलिमा नरेश अडसरे विजयी ठरल्या आहेत.
नारसिंगी ग्राम पंचायतीत भाजपच्या नलुबाई प्रवीण काकडे विजयी
मोहदी धोत्रा येथे राष्ट्रवादीचे राजेंद्र नाखले विजयी