नागपूरचा हर्षित झाला लेफ्टनंट ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:08 AM2021-01-03T04:08:52+5:302021-01-03T04:08:52+5:30
नागपूर : अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या भारतीय लष्कर सेवेत नागपूरच्या हर्षित अरमरकरची लेफ्टनंट म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली. नुकतेच ...
नागपूर : अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या भारतीय लष्कर सेवेत नागपूरच्या हर्षित अरमरकरची लेफ्टनंट म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली. नुकतेच इंडियन मिल्ट्री अकॅडमी डेहराडून येथे झालेल्या पासिंग आऊट परेडमध्ये शानदार कार्यक्रमात हर्षितचे नियुक्तीपत्र बहाल करण्यात आले.
या नियुक्तीप्रसंगी त्याचे वडील राजेश अरमरकर आई प्रतीक्षा आणि बहीण अदिती उपस्थित होते. हर्षितने आरआईएमसी मिल्ट्री कॉलेज डेहराडून येथे ५ वर्षे प्रशिक्षण कालावधी पूर्ण करून खडकवासला येथे नॅशनल डिफेन्स अकॅडमी येथे प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर इंडियन मिल्ट्री अकॅडमी येथे एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण केले. या नियुक्तीनंतर मद्रास रेजिमेंटमध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे. हर्षितची आई प्रतीक्षा अरमरकर आरआयएमसी प्रवेश परीक्षेसाठी मार्गदर्शन करते व वडील राजेश अरमरकर हे एक प्रतिष्ठित व्यवसायी आहेत. आईच्या प्रोत्साहनाने आणि प्रयत्नांतून त्याने या सेवेत प्रवेश केला. आईचे त्याला सतत मार्गदर्शन मिळाले. या नियुक्तीने सैन्य सेवेतील नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा राेवला गेला आहे.